scorecardresearch

आलिया भट्टप्रमाणेच घ्या तुमच्या त्वचेची खास काळजी, जाणून घ्या काय आहे तिच्या चमकदार त्वचेचं रहस्य

बॉलीवूडची सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

lifestyle
त्वचेवर काहीही लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे.(photo: indian express)

बॉलीवूडची सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. आलिया भट्ट तिच्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घेते, जेणेकरून ते आणखी सुंदर दिसतील. तिच्या चमकणाऱ्या त्वचेची चाहत्यांनाही खात्री आहे. केवळ मुलंच नाही तर मुलींनाही तिच्या सौंदर्याचं वेड आहे. आलिया भट्टने सांगितले आहे की ती तिच्या त्वचेची काळजी कशी घेते. चला तर मग जाणून घेऊया-

डार्क सर्कल आणि ड्रायनेस

‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत दाखल झालेल्या आलिया भट्टने एका मुलाखतीत सांगितले की, ती डार्क सर्कल आणि ड्रायनेस दूर ठेवण्यासाठी आय क्रीम वापरते. यानंतर टरबूज नियासीनामाइड हे मॉइश्चरायझर चेहर्‍यावर लावते. दरम्यान टरबूज नियासीनामाइड हे मॉइश्चरायझर हा एक प्रकारचा व्हिटॅमिन बी-३ आहे, जो त्वचेला गुळगुळीत आणि मॉइश्चरायझ ठेवण्याचं काम करतो. याव्यतिरिक्त, हे हायपरपिग्मेंटेशनची समस्या देखील दूर करते.

आलिया भट्ट डाएट

जिम आणि व्यायामाव्यतिरिक्त आलिया तिच्या डाएटवर विशेष लक्ष देते. यासाठी ती दर दोन तासांनी नक्कीच काहीतरी खात असते. तसेच आलिया नाश्त्यासाठी ऑम्लेट, अंड्याचा पांढरा गर किंवा सँडविच आहारात घेत असते.

हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्याने काळजी वाटते? तर ‘या’ ५ घरगुती उपायांनी बनवा मऊ आणि सुंदर

नियमित व्यायाम

आलिया तिच्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये कार्डिओ, रनिंग, किकबॉक्सिंग इत्यादींचा समावेश करते. याशिवाय ती नियमितपणे पिलेट्स, योगा, वेट ट्रेनिंग आणि नृत्य देखील करते.

कॅफिन सोल्यूशन ड्रॉप

आलिया भट्टने चेहर्‍याची काळजी घेताना सांगितले की ती डोळ्याखाली कॅफिन सोल्यूशनचे थेंब वापरते. ज्याने डोळ्यांखालील सूज आणि पाणी टिकून राहण्याची समस्या कमी होते. यानंतर आलिया चेहर्‍याची सुंदरता टिकून राहण्यासाठी टरबूजाच्या रसापासून बनवलेले मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहर्‍यावर सनस्क्रीन लावते.

सनबर्नपासून वाचा

आलियाने सनस्क्रीनबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे सूर्याच्या किरणांच्या संपर्कात नसले तरी सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचेचा उन्हापासून बचाव होतो, त्याचबरोबर वृद्धत्वाची लक्षणेही कमी दिसतात. मात्र, त्वचेवर काहीही लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Take special care of your fitness know the secret of alia bhatt glowing skin scsm