तमन्नाने शेअर केली सिक्रेट ब्युटी टिप, २ मिनिटात चेहऱ्यावरील सुज गायब!

तमन्नाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

tamannaah bhatia, tamannaah bhatia instagram,
तमन्नाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तमन्ना सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तमन्नाने यावेळी चेहऱ्याची सुज कमी होण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तमन्नाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तमन्नाने आपल्या चेहऱ्यावरील सूज कशी कमी झाली पाहिजे हे सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये तमन्ना सगळ्यांना शुभ सकाळ बोलते. त्यानंतर तिची रात्री झोप झाली नाही आणि म्हणून माझा चेहरा सुजला आहे असे तमन्ना म्हणते. पुढे सुज कमी करण्यासाठी तिच्याकडे एक ट्रिक आहे. तमन्नासमोर एक मोठं वाडग आहे. त्या वाडग्यात थंड पाणी आणि त्यासोबत बर्फ आहे. चेहऱ्यावर असलेली सूज कमी करण्यासाठी तमन्ना तिचा चेहरा त्या वाडग्यात टाकते आणि चेहरा शेकते.

आणखी वाचा : ‘मृणाल आत्ता हे अति होतंय’, बोल्ड फोटोमुळे मृणाल ठाकूर झाली ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त

तमन्नाचे लाखो चाहते आहेत. तमन्नाने या आधीही ब्युटी टिप्स शेअर केल्या आहेत. दरम्यान, ‘बोले चुडिया’ या बॉलिवूड चित्रपटातून तमन्ना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. यानंतर ती आणखी काही तेलुगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tamannaah bhatia skin care tips to get rid of puffy face very quickly dcp