रतन टाटांचं स्वप्न असलेली ‘ही’ कार बंद होण्याच्या मार्गावर

कंपनीकडून सध्यातरी या गाडीचं उत्पादन सुरू आहे, पण गाडीची विक्री खूप कमी झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही महिन्यांमध्ये विक्री कमी झाल्यामुळे टाटा कंपनीने इंडिका आणि इंडिगो या आपल्या दोन कारचं उत्पादन थांबवलं होतं. आता टाटाची सर्वात छोटी कार नॅनोचंही उत्पादन कंपनीकडून थांबवलं जाणार असल्याची चर्चा आहे. कंपनीकडून सध्यातरी या गाडीचं उत्पादन सुरू आहे, पण गाडीची विक्री खूप कमी झाली आहे.

वर्ष २००९ मध्ये टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांच्या स्वप्नातला प्रोजेक्ट म्हणून लॉन्च झालेली नॅनो कार गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीये. २०१८ मध्ये या कारच्या केवळ 1,851 युनिट्सची विक्री झाल्याची माहिती आहे. त्यामुळे होणारा तोटा लक्षात घेऊन कंपनीकडून लवकरच या गाडीचं उत्पादन बंद केलं जाणार असल्याची चर्चा आहे. वर्ष २०१२ मध्ये सर्वाधिक म्हणजे ७४,५२४ गाड्यांची विक्री झाली होती. त्यानंतर विक्री कमी झाली. २०१६ मध्ये पुन्हा थोडी तेजी पाहायला मिळाली आणि २१,०१२ गाड्यांची विक्री झाली. त्यानंतर पुन्हा विक्री घटली आणि २०१७ मध्ये केवळ ७,५९१ आणि २०१८ मध्ये केवळ १८५१ गाड्यांची विक्री झाली.

२०१५ मध्ये कंपनीने या कारचं GenX व्हर्जन लॉन्च केलं होतं. यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आली होती. पण तरीही या गाडीची विक्री वाढली नाही. अखेर आता या गाडीचं उत्पादन बंद करण्याचं कंपनीने ठरवलं असल्याची चर्चा आहे. कंपनीच्या साणंद, गुजरातच्या प्रकल्पात सध्या नॅनोऐवजी टियागो या नव्या मॉडेलचं उत्पादन सुरू झाल्याचीही माहिती आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tata nano exports come to naught may stop production

ताज्या बातम्या