Tata Punch vs Nissan Magnite: कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स असलेली स्टायलिश एसयूव्ही कोणती?

बाजारात या मायक्रो आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मोठी रेंज आहे, जर तुम्हालाही अशीच एसयूव्ही घ्यायची असेल तर हे पर्याय नक्कीच तपासा.

Tata-vs-Nissan
(फोटो- NISSAN आणि TATA)

देशातील कार क्षेत्रातील कॉम्पॅक्ट आणि मायक्रो एसयूव्हीची झपाट्याने वाढणारी मागणी पाहता, अनेक कंपन्यांनी कमी किंमतीत अधिक वैशिष्ट्यांसह या एसयूव्ही लाँच केल्या आहेत. त्यामुळे बाजारात या मायक्रो आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मोठी रेंज आहे, जर तुम्हालाही अशीच एसयूव्ही घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे.येथे आम्ही देशातील दोन कॉम्पॅक्ट एसयूव्हींबद्दल सांगत आहोत ज्या कमी किंमतीत प्रीमियम फीचर्ससह मजबूत स्टाइल आणि पॉवर देतात. टाटा पंच आणि निसान मॅग्नाइट एसयूव्ही याची तुलना करून या दोघांच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशील सांगू.

टाटा पंच

टाटा पंच ही कंपनीची सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही आहे, जी कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात आणली आहे. या एसयूवीमध्ये, टाटाने ११९९ सीसीचे इंजिन दिले आहे जे १.२ लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे जे ८६ पीयेस पॉवर आणि ११३ एनयम पीक टॉर्क जनरेट करते, जे ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सशी जुळलेले आहे. या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ७.० इंचाची टचस्क्रीन प्रणाली आहे.

( हे ही वाचा: Gold: सर्वात स्वस्त सोनं ‘इथे’ उपलब्ध; १० ग्रॅमवर बंपर सवलत! )

याशिवाय ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाईट, क्रूझ कंट्रोल, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडी, एबीएस आणि मागील पार्किंग कॅमेरा यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. टाटा पंचचे मायलेज घेताना कंपनीचा दावा आहे की ही एसयूवी १९ किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत ५.४९ रुपये आहे, जी टॉप मॉडेलमध्ये ९.०९ लाख रुपये आहे.

निसान मॅग्नाइट

ही त्याच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट एसयूवी आहे, ज्याचे पाच प्रकार कंपनीने बाजारात लॉन्च केले आहेत. या एसयूवी मध्ये कंपनीने ९९९ सीसीचे इंजिन दिले आहे ज्यामध्ये दोन प्रकारांचा पर्याय उपलब्ध आहे. पहिले इंजिन १.० लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि दुसरे १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे.इंजिनबद्दल बोलायचे झाले तर हे इंजिन ७२ पीएस पॉवर आणि ९६ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. त्याचे दुसरे इंजिन १०० पीएस पॉवर आणि १६० एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि ही दोन्ही इंजिने 5-स्पीड नॅचरल आणि सीवीटी गिअरबॉक्सशी जोडलेली आहेत.

( हे ही वाचा: या ‘चार’ राशीच्या मुली त्यांच्या जोडीदारासाठी मानल्या जातात खूप भाग्यवान; लग्नानंतर त्यांच्या पतीचे नशीब चमकते )

मॅग्नाइटच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात ८.० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी अॅप्पल कारप्ले आणि अॅड्रॉयड ऑटो कनेक्ट ला सपोर्ट करते. याशिवाय ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, एअर प्युरिफायर, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंगची वैशिष्ट्ये. जसे सेन्सर, ईबीडी, एबीएस देखील दिलेले आहेत.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की हा मॅग्नाइट २० किलोमीटर चा मायलेज देतो. त्याची सुरुवातीची किंमत ५.७१ लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलमध्ये १०.१५ लाख रुपयांपर्यंत जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tata punch vs nissan magnite which is the stylish suv with premium features in low budget ttg

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या