टाटा स्काय या डीटूएच कंपनीनं ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे. कंपनीनं आपल्या Binge+ या सेवेसाठी नवी ऑफर आणली आहे. कंपनीनं या सेवेची किंमत ५ हजार ९९९ रूपयांवरून ३ हजार ९९९ रूपये इतकी केली आहे. Binge+ यासोबतचं कंपनी ३ ते ६ महिन्यांचा ओटीटी कॉटेंटचं मोफत सबस्क्रिप्शनही देणार आहे. या सेवेत कंपनी आपल्या ग्राहकांना एकाच रिमोटद्वारे आपल्या टिव्ही स्क्रिनवर सॅटलाईट ब्रॉडकास्ट चॅनल आणि ओटीटी कॉटेन्ट पाहण्याची सुविधा देत आहे.

टाटा स्काय Binge+ द्वारे युझर कोणताही शो, चित्रपट, संगीत किंवा गेम आपल्या लॅपटॉप, टॅब किंवा मोबाईल फोनवरही पाहू शकतो. तसंच ते बिल्ट इन क्रोमकास्टद्वारे टिव्हीवरही पाहता येतात. टाटा स्कायचा Binge+ हे गुगल असिस्टंटद्वारे येतं. गुगल असिस्टंटचा सपोर्ट असल्यानं प्ले स्टोअरवरील गेम्स आणि अॅप्सचा आनंदही आपल्याला घेता येऊ शकतो.

मिळणार ‘हे’ सबस्क्रिप्शन

टाटा स्काय Binge+ एक नेक्स्ट जेन अँड्रॉईड अॅप आहे. एचडीएमआय आऊटपूटमुळे तो 4K, HD, LED, LCD आणि प्लाझ्मा टिव्हीसोबतही कनेक्ट करता येऊ शकतो. या बॉक्सला ऑडिओ व्हिडीओ केबलही कनेक्ट करता येत असल्यानं तो जुन्या टिव्हीलाही कनेक्ट करता येतो. ३ हजार ९९९ रूपयांना मिळणाऱ्या या कनेक्शन सोबत डिझनी प्लस, हॉटस्टार, हंगामा प्ले, शीमारू, इरॉस नाऊ यांचं सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे. यासोबतच कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय ग्राहकांना अॅमेझॉन प्राईमच्याही सेवांचा तीन महिने आनंद घेता येणार आहे.