Teacher’s Day 2022: आज ५सप्टेंबर म्हणजेच शिक्षकदिन. शिक्षकांची आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची भूमिका असते, कारण ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर ते आपल्याला व्यावहारिकपणे येणाऱ्या आव्हानांसाठी जागरूक आणि तयार देखील करतात. याच गुरुंविषयी आदर, भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ‘शिक्षक दिन’. भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरूंसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.आपल्याकडे शिक्षकाला देखील आईवडील यांच्या बरोबरीचे स्थान दिले जाते.

शिक्षक दिनाचा इतिहास

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा ५सप्टेंबरला असतो आणि हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्याचसोबत त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली होती. असे असून सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

( हे ही वाचा; विद्यार्थ्यांनो सावधान! शिक्षकदिनी ‘या’ चुका अजिबात करू नका)

शिक्षक दिनाचे महत्त्व (Teachers Day Importance)

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक दिनाचे महत्त्व खूप आहे. कारण शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्याचे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतो. तो विद्यार्थ्याला चांगल्या आणि अयोग्यची समज शिकवतो. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याला या महत्वाच्या दिवशी शिक्षकाच्या या मेहनतीबद्दल आभार मानण्याची संधी मिळते. म्हणून हा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खास मानला जातो.

या दिवशी कोणते काम करावे?

या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विविध कार्यक्रम असले तरी शिक्षकांचा आदर केला जातो, परंतु विद्यार्थी किंवा कर्मचारी म्हणून आपण या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे आपल्या शिक्षकांशी संपर्क साधणे. तसेच त्यांचे आभार मानणे. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे त्याने एक विशेष आणि मोठी भूमिका का बजावली आहे.