इन्फिनिक्स कंपनीने इनबुक एक्स वन सीरिजमार्फत लॅपटॉप क्षेत्रात प्रवेश केला आहे. विंडोज अकरा इंटेल कोअरने सज्ज असलेल्या या लॅपटॉपमध्ये आय ३ प्रोसेसर, आठ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोअरेज ही प्राथमिक सुविधा आहे. याखेरीज हा लॅपटॉप आय ५ आणि आय ७ या प्रकारांतही उपलब्ध आहे. वजनाने हलका,  हाताळण्यास सहज असलेला हा लॅपटॉप पूर्णपणे धातूयुक्त बाह्यावरणाने घडवण्यात आला आहे. युजर्सना सोईस्करपणे काम करण्याची सुविधा देणाऱ्या या लॅपटॉपमध्ये १४-इंच फुल एचडी आयपीएस डिस्प्लेसह

१८०-अंश व्युईंग अँगल आहे. इनबुक

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Facebook Update video player In vertical full screen That Offers alongside video playback controls
फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या

एक्स१ लॅपटॉप नोबल रेड, स्टारफॉल ग्रे आणि अरोरा ग्रीन अशा तीन प्रीमिअम व आकर्षक रंगांमध्ये येतो. यामध्ये ५५ डब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी असून ती १३ तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक देते.   

’ किंमत : ३५९९९ रुपये

पेटीएमवरून ऑफलाइन पेमेंट सुविधा

पेटीएमने ‘टॅप टू पे’च्या लाँचची घोषणा केली. हे वैशिष्ट्य युजर्सना पीओएस मशीनवर त्यांचा फोन टॅप करत त्यांच्या पेटीएम नोंदणीकृत कार्डच्या माध्यमातून त्वरित पेमेण्ट्स करण्याची सुविधा देते. फोन लॉक असताना किंवा मोबाइल डेटा किंवा इंटरनेट कनेक्शन नसतानादेखील ही सेवा कार्यरत राहते. पेटीएमची ‘टॅप टू पे’ सेवा पेटीएम ऑन-इन-वन पीओएस डिवाईसेस आणि इतर बँकांच्या पीओएस मशिन्सच्या माध्यमातून देय भरणाऱ्या अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे.

सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिव्हल

सॅमसंग ब्रॅण्डने ५५ इंच व त्यावरील आकाराच्या टेलिव्हिजनच्या क्यूएलईडी व यूएचडी संचांसाठी सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. एक ते ३१ जानेवारीपर्यंत देशभरातील सर्व प्रमुख ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्समध्ये या सवलतींचा लाभ घेता येऊ शकतो. यात ८५-इंच व ७५-इंच निओ क्यूएलईडी ८के टीव्हींच्या खरेदीवर ९४,९९० रुपयांचे साऊंडबार मोफत देण्यात येत आहेत. ६५-इंच निओ क्यूएलईडी ८के टीव्ही, ७५-इंच यूएचडी टीव्ही, ६५-इंच व ५५-इंच निओ क्यूएलईडी टीव्ही आणि ६५-इंच व ५५-इंच क्यूएलईडी टीव्हींच्या खरेदीवर ग्राहकांना गिफ्ट म्हणून २१,९९९ रुपये किमतीचा गॅलॅक्सी ए७ एलटीई टॅब देण्यात येत आहे. तसेच कॅशबॅकच्या योजनाही कंपनीने जाहीर केल्या आहेत.

हायरचा नवीन मायक्रोव्हेव ओव्हन सादर

 हायरने नवीन कन्व्हेक्शन मायक्रोव्हेव ओव्हन सादर केला. हा ओव्हन सुटसुटीत आणि बहुपयोगी डिझाइनसमवेत निर्माण केला आहे. यामुळेच हा भारतीय स्वयंपाकघरांसाठी उपुयक्त आहे. या ओव्हनमध्ये २०३ ऑटो कुक मेन्यू, मल्टिस्टेज र्कुंकग पर्याय, चार कॉम्बिनेशन फंक्शन आहेत. तसेच यात स्टेनलेस स्टील कॅव्हिटी, ऑइल फ्री र्कुंकग पर्याय, डिओडायझर, ९९ मिनिट र्कुंकग टायमर, ब्रेड बास्केट, वेळ आणि चाइल्ड लॉक अशा अनेक सुविधा आहेत. या मायक्रोव्हेव ओव्हनला संपूर्ण काळ्या रंगाच्या बॉडीवर लाल रंगाचं हँडल आणि डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे.

’ किंमत १७ हजार रुपये