Apamarga chirchitta benefits : चुकीच्या ब्रश करण्याच्या पद्धतीमुळे प्लाक जमा होणे, जीवाणू, जंक व साखरेचे पदार्थ, तंबाखू, धूम्रपान किंवा शरीरात पाण्याची कमतरता अशा अनेक कारणांमुळे तोंडाचे आरोग्य बिघडू शकते. या कारणीभूत घटकांमुळे दात कमकुवत होतात, हिरड्यांना सूज येणे, रक्तस्राव होणे, तोंडाला दुर्गंधी येणे, पोकळी निर्माण होणे आणि वारंवार संसर्ग होणे यांसारख्या समस्या वाढतात. हार्मोनल बदल आणि काही औषधेदेखील हिरड्यांवर नकारात्मक परिणाम करू शकतात. जर तुम्हाला दंतवैद्याकडे वारंवार जाणे टाळायचे असेल, तर आयुर्वेदिक तज्ज्ञांनी शिफारस केलेले हर्बल पानांपासून बनवलेली नैसर्गिक टूथपेस्ट तुमच्या तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.
पिवळे दात पांढरे करायचे असतील, तर तुम्ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या पानांपासून टूथपेस्ट बनवून त्याचा वापर करावा. या पानांची पेस्ट आणि माऊथवॉश म्हणून वापर केल्याने तोंडातील अल्सर, हिरड्यांना सूज येणे व हिरड्यांमधून रक्त येणे या त्रासांपासून सुटका होते. अशा या बहुमोल आयुर्वेदिक औषधी वनस्पतीला अपा मार्ग वा चिरचिता किंवा लाटजिरा, असे म्हणतात. ही वनस्पती शतकानुशतके आयुर्वेदात दात आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वापरली जात आहे. ही वनस्पती अनेकदा रस्त्यांवर किंवा रिकाम्या जागी सहज आढळते.
आयुर्वेदिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अपा मार्ग नावाच्या वनस्पतीच्या नियमित वापरामुळे हिरड्यांमधून रक्त येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, पोकळी येणे व दातांची संवेदनशीलता यांसारख्या अनेक मुख समस्या नैसर्गिकरीत्या सुधारल्या जातात. ही वनस्पती सामान्य, वारंवार होणाऱ्या तोंडाच्या संसर्गापासूनदेखील आराम मिळवून देते. अपा मार्गाची पाने दातांच्या समस्यांमध्ये कशी मदत करू शकतात आणि त्यांचा वापर कसा करता येईल ते जाणून घेऊया.
अपामार्गाच्या पानांमुळे तोंडाचे आरोग्य कसे सुधारते?
अपा मार्गाच्या पानांचे अँटीमायक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात, ज्यामुळे दातांमधील पोकळी, दुर्गंधी आणि हिरड्यांची जळजळ यांपासून नैसर्गिक आराम मिळतो. त्याचे अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म सुजलेल्या, वेदनादायक व रक्तस्रावी हिरड्यांना आराम देण्यासाठी प्रभावी मानले जातात. नियमितपणे पाने चावल्याने हिरड्या मजबूत होतात आणि रक्तस्राव कमी होतो.
अपा मार्गामध्ये आढळणारी खनिजे दातांच्या मुळांना मजबूत करतात आणि त्यावरील मुलामा संरक्षित करतात, तसेच दात किडणे किंवा कमकुवत होण्याचे प्रमाण कमी करतात. त्याच्या पानांचे नैसर्गिक गुणधर्म तोंडाची दुर्गंधी दूर करतात आणि तोंड स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. अपा मार्गामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करून, तोंडाच्या पेशींचे संरक्षण करतात, ज्यामुळे तोंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते
अपा मार्ग तीन प्रकारे वापरता येतो
हिरड्यांना मालिश करण्यासाठी पाने चावणे
सकाळी रिकाम्या पोटी ३-४ ताजी पाने धुऊन चावा. ती चावताना, तुमच्या हिरड्यांना हलक्या हाताने मालिश करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे हिरड्या मजबूत होतात आणि रक्तस्राव कमी होतो.
नैसर्गिक माऊथवॉशचे गुणधर्म
एक कप पाणी उकळवा. त्यात ४-५ पाने घाला आणि ३-४ मिनिटे उकळवा. पाणी थंड झाल्यावर, सकाळी आणि संध्याकाळी त्या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होईल आणि तुमचा श्वास ताजातवाना होईल.
टूथ पावडर आणि टूथपेस्टची निर्मिती
वाळलेल्या पानांची पावडर बारीक करा आणि ती टूथ पावडर म्हणून वापरा. त्या पावडरीचे टूथपेस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी ती पावडर मोहरीच्या तेलात किंवा मधात मिसळा. मग या टूथपेस्ट हिरड्यांवर २-३ मिनिटे मालिश करा. या टूथ पावडर वा टूथपेस्टच्या नियमित वापराने तोंडाच्या बहुतेक समस्या हळूहळू कमी होतात.
सावधगिरी
अत्यंत संवेदनशील हिरड्या असलेल्या लोकांनी सुरुवातीला या वनस्पतीचा थोड्या प्रमाणात वापर करावा. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही औषधी वनस्पती वापरू नयेत. जर हिरड्यांमध्ये तीव्र वेदना किंवा सूज येत राहिली, तर दंतवैद्याचा सल्ला घ्यावा.
