Thalapathy Vijay Fitness Secrets at 51: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकारणातही सक्रिय झालेले विजय ऊर्फ ‘थलपती विजय’ हे त्यांच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही चर्चेत असतात. ५१ वर्षांच्या वयातही त्यांची ऊर्जा, शरीरयष्टी आणि स्क्रीनवरील उपस्थिती पाहून चाहते थक्क होतात. पण, त्यांच्या या जबरदस्त फिटनेसचं रहस्य काय आहे? यामागे दडलेली कहाणी हळूहळू उलगडत जाते…
“इतका फिट कसा राहतो हा स्टार” चाहत्यांचा कायम प्रश्न
सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न विजय इतकी वर्षं सतत एवढे फिट कसे राहतात? उत्तर साधं आहे; पण तितकंच शिस्तबद्ध आणि कठोरही. त्यांच्या लाइफस्टाईलमध्ये कोणतीही ढिलाई नाही. शूटिंग असो वा राजकीय कार्यक्रम, ते आपल्या दिनचर्येपासून कधीही दूर जात नाहीत.
“स्वतःचा डबा सोबत घेऊन फिरणारा स्टार!”
फिटनेस ट्रेनर नरेश कुमार यांच्या माहितीनुसार, थलपती विजय त्यांच्या खाण्यापिण्याबाबत कधीही तडजोड करत नाहीत. ते अनेकदा स्वतःचा घरचा डबा सोबत घेऊन प्रवास करतात. बाहेरचं तळलेलं, मसालेदार आणि जंक फूड ते जवळजवळ पूर्णपणे टाळतात.
त्यांचा ठाम विश्वास आहे “फक्त व्यायाम नाही, तर योग्य आहारच फिटनेसची खरी गुरुकिल्ली आहे.”
जंक फूडपासून कठोर अंतर… पण का?
आजच्या वेगवान जीवनशैलीत जंक फूड सहज मिळतं; पण थलपती विजय त्यापासून मुद्दाम दूर राहतात. कारण- अशा अन्नात जास्त तेल, मीठ आणि प्रक्रिया केलेले घटक असतात, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे थकवा, वजनवाढ आणि सुस्ती यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ते नेहमी घरगुती आणि पौष्टिक आहारालाच प्राधान्य देतात.
“त्यांचा डाएट प्लॅन काय सांगतो?”
त्यांच्या आहारात प्रोटीन आणि पोषणमूल्यांनी भरपूर असे पदार्थ असतात.
- उकडलेल्या भाज्या
- डाळ
- सॅलड
- फळे
- हलका आणि साधा आहार
त्याशिवाय ते भरपूर पाणी पितात, जे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
शिस्तच त्यांचा खरा ‘सीक्रेट कोड’
थलपती विजय यांच्या फिटनेसचं सर्वांत मोठं रहस्य म्हणजे शिस्त.
ते वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम कधीही सोडत नाहीत.
त्यांच्या मते, फिटनेस हा काही महिन्यांचा नाही, तर आयुष्यभराचा प्रवास आहे.
वर्कआऊटमध्येही सस्पेन्स!
त्यांच्या वर्कआऊट रूटीनमध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि शरीर लवचिक ठेवणारे व्यायाम यांचा समावेश आहे. ते शरीर ‘मोठं’ बनविण्यापेक्षा फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यावर भर देतात.
शेवटचा धडा तरुणांसाठी मोठा संदेश
थलपती विजय यांची जीवनशैली एकच गोष्ट स्पष्ट करते
फिट राहण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सची गरज नाही.
फक्त जंक फूड कमी करा, घरचं साधं अन्न खा आणि रोज थोडा व्यायाम करा…
आणि शरीराला शिस्त लावा.
त्यांच्या या साध्या, पण कठोर नियमांमुळेच आजही ५१ व्या वर्षी ते तरुणांना टक्कर देणारे सुपरफिट स्टार ठरले आहेत.
