एकदा लग्न झालं की प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतो. लग्नानंतर पती-पत्नीचं नात आणखी घट्ट होत असतं आणि कालांतराने बदल होत असल्याचं अनेकांच्या लक्षात देखील येतं. लॉंग टर्म रिलेशनशीपमध्ये वेगवेगळे टप्पे असतात जे नवनव्या भावना, आव्हानं आणि नात्याला आणखी घट्ट करण्यासाठीच्या संधी घेऊन येतात. प्रत्येक जण या टप्प्यांमधून जात असतो आणि जोडीदारासोबतच्या नात्याला आणखी वेगळ्या रूपात घडवत असतो.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

१. हनीमूनचा टप्पा

सहसा लग्नानंतरचे पहिले एक किंवा दोन वर्ष हे एकमेकांसाठीच्या उत्कटतेने भरलेला असतो. आपल्या जोडीदारासाठी आकर्षण जाणवू लागतं. या सुरुवातीच्या काळात काही जोडपी एकमेकांना समजून घेण्यासाठी व खुश राहण्यासाठी एकमेकांच्या जास्तीत जास्त सहवासात राहतात तर काही जोडपी जबाबदाऱ्या व कर्तव्याच्या ओझ्याखाली दबून गेल्यासारखी राहू लागतात. यामुळे दोघांमध्ये नकारात्मक विचार जन्मास येऊ लागतात. प्रत्येक जोडप्याने आपलं सांसारिक जीवन एखाद्या मजेदार राईडसारखं जगलं पाहिजे. कारण यात एकमेकांसोबत आनंदाने जीवन जगण्याचा व एकत्र काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.

२. चांगल्या आणि वाईट गोष्टी स्वीकारण्याचा टप्पा:

लग्नाचा हनीमूनचा टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो. कधीकधी हळूहळू, तर कधी अचानकपणे, वधू वर आणि त्यांच्या आयुष्यावर एकत्रित परिणाम करणाऱ्या परिस्थितीनुसार हा टप्पा सुरू होत असतो. हा साक्षात्काराचा टप्पा आहे, ज्यात आपण आपल्या जोडीदाराची ताकद, कमकुवतपणा आणि वैयक्तिक सवयींबद्दल तसंच कदाचित आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी कळू लागतात. प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांना एकमेकांमधील चांगल्या-वाईट सवयी माहित असतात तर अरेंज्ड मॅरेजमध्ये याच्या एकदम उलट असते. अशावेळी आपल्या जोडीदाराची एखादी सवय खटकू लागल्यास त्यावरुन वाद घालत बसण्यापेक्षा प्रेमाने संवाद साधा व समस्या सोडवा.

३. मोहभंग

नात्याचा तिसरा टप्पा म्हणजे भ्रमनिरास अवस्था. लग्न काळातील मजा व हनीमून संपल्यानंतर काही जोडप्यांना पुन्हा एकदा पहिल्यासारखं जीवन रटाळ वाटू लागतं. संसारात गैरसमजांना निमंत्रण येऊ शकतं. संवाद आटल्यास पुढे जाऊन नातं खिळखिळं होऊ शकतं हे अनेक जोडपी विसरुनच जातात. त्यामुळे या काळात दूर पळण्यापेक्षा, वाद घालण्यापेक्षा, संवाद टाळून रुसून बसण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रत्येक जोडप्याने प्रयत्न करावा. संवाद ही सुखी नात्याची महत्वाची पायरी असते जी पार करणं सोपं नसतं.

४. दुर्गुणांना स्वीकारण्याचा टप्पा:

लग्नानंतरच्या या चौथ्या टप्प्यात पती-पत्नींना हे समजण्यास सुरवात होते की त्यांनी जोडीदारामधल्या गुणांइतकंच दुर्गुणांसोबत सुद्धा लग्न केलंय. मग त्यानंतर प्रत्येकजण स्वत: ला यातून बाहेर काढण्यासाठी नवीन मार्ग शोधू लागतो. या टप्प्यात जोडीदाराच्या दुर्गुणांना स्वीकारून पुन्हा नव्याने नातं निर्माण करून पुनर्मिलन करण्याचा हा टप्पा असतो. यात आपण पुन्हा एकमेकांना नव्याने ओळखू लागतो. नात्यातील जुन्या आठवणींची पेटी उघडून नात्याला नवं वळण देण्याचा प्रयत्न या टप्प्यात केला जातो.

५. पुन्हा नव्याने नातं घडवण्याचा टप्पा:

एका सुदृढ नात्याची वीण ही पती-पत्नी दोघांच्या हातात असते. पती-पत्नी दोघांनाही नातं हेल्दी बनवण्यासाठी प्रत्येक क्षणी प्रयत्न करावे लागतात. संसार हा अनेक अडचणी व संघर्षांनी भरलेला असतो त्यामुळे दोघांनाही बहुतांश वेळा मनस्ताप भोगावा लागतो. पण लग्नाच्या नात्यातही एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी सांभाळल्या तर तुम्ही ते ते सर्व शिकू शकता जे लग्नाआधी शक्य नाही झालं. या सर्व गोष्टी नाती अजूनच सुदृढ व मजबूत बनवण्यास फायदेशीर ठरतात. जगात काहीही परफेक्ट आणि मनासारखं मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ते तुम्हाला कधीच सापडणार नाही. त्यापेक्षा जे आहे त्याचा स्वीकार करणं हा उत्तम पर्याय असून नात्याला पुन्हा नव्याने आकार देण्याचा हा टप्पा असतो.