Apple आयफोन १३ सिरिज आज होणार लॉंच; जाणून घ्या फीचर्स

अॅपल आयफोन १३ सिरिज १४ तारखेला लॉंच होणार आहे.

अ‍ॅप्पलने १४ सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे.

Apple ने आपल्या आगामी इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट आज १४ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित असलेले iPhone 13 सिरिज सादर होऊ शकते. या सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच केले जाऊ शकतात.

भारतात हा इव्हेंट पहा या वेळेत

हा Apple इव्हेंट येत्या १४ सप्टेंबरला कॅलिफोर्निया येथील अ‍ॅप्पल पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची सुरुवात 10:00 a.m. PDT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. अ‍ॅप्पल या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण करणार असून या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून iPhone 13 series चा लाँच इव्हेंट भारतीयांना देखील पाहता येईल.

अ‍ॅप्पलने १४ सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे. परंतु कंपनीने या इव्हेंटमध्ये कोणकोणते प्रोडक्टस लाँच होतील याची माहिती दिली नाही. मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्सनुसार या इव्हेंटमधून आयफोन 13 सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मॉडेल सादर केले जाऊ शकतात.

ही सिरिज होणार लॉंच

Apple कंपनी लवकरच नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे. तसेच कंपनीचा सप्टेंबरमध्ये इव्हेंट असतो. या इव्हेंटमध्ये iPhone 13 सीरिज लाँच करण्याची शक्यता आहे. लाँचिंग आधीच नेहमीप्रमाणेच लीक्स समोर येत आहे. आयफोन १३ यामध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max ला लाँच केले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार, आयफोन १३ मध्ये १२० हर्ट्ज हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले दिला जाईल व इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. याशिवाय कंपनी कॅमेऱ्यात देखील मोठा बदल करणार आहे.

अॅपल आयफोन १३ सिरिज (Apple iPhone 13 series) व्यतिरिक्त कंपनी आज १४ सप्टेंबरच्या अ‍ॅप्पल इव्हेंटमधून Apple Watch Series 7 देखील बाजारात आणण्याची शक्यता आहे. तसेच जूनमध्ये आयोजित WWDC 2021 इव्हेंटच्या मंचावरून अ‍ॅप्पलने iOS 15 सादर केला होता, हे नवीन आयओएस व्हर्जन देखील आज  १४ सप्टेंबरला अधिकृतपणे रोलआउट केले जाऊ शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The apple iphone 13 series will be launched on the 14th and will be available in india at this time scsm

ताज्या बातम्या