scorecardresearch

दिवाळीत घरीच तयार करा श्रीखंडासाठी लागणारा चक्का; जाणून घ्या कृती

जाणून घ्या, चक्क्यासोबतच श्रीखंड करण्याचीही कृती

दिवाळी म्हटलं की सगळ्या घरांमध्ये फराळ आणि गोड पदार्थांचे वास दरवळू लागतात. करंजा, लाडू, अनारसे अशा अनेक गोड पदार्थांसोबतच लक्ष्मीपूज, पाडवा या दिवशी पेढे किंवा बर्फी असे पदार्थ नैवेद्यासाठी ठेवले जातात. मात्र, प्रत्येक वेळी हे पदार्थ बाजारातून आणण्यापेक्षा घरच्या घरी करणं अधिक चांगलं. त्यामुळे श्रीखंडासाठी लागणारा चक्का घरीच कसा तयार करावा हे जाणून घेऊयात.

श्रीखंड हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यातही आता बाजारात या श्रीखंडामध्ये अनेक फ्लेवर मिळू लागले आहेत. यात ड्रायफ्रूट्स, आम्रखंड यांची मागणी जास्त असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच्या किंमतीही जास्त असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अनेक जण बाजारातून चक्का विकत आणतात आणि घरीच या चक्क्यापासून श्रीखंड तयार करतात. मात्र चक्कादेखील बाजारातून आणण्यापेक्षा जर तोच घरी केला तर? त्यामुळे चक्का नेमका कसा करावा आणि त्यापासून श्रीखंड कसं करावं हे पाहुयात.

चक्का कसा करावा?
३०० ग्रॅम चक्कासाठी ५०० ग्रॅम ताजे दही, बारीक मलमलच्या कपडय़ामध्ये १ दिवस टांगून ठेवावे. नंतर त्यावर वजन ठेवून कमीत कमी अर्धा तास तरी (प्रेस) दाबून ठेवावे. यामुळे जो काही पाण्याचा अंश उरला असेल तर तो बाहेर येईल.

श्रीखंड कसं करावं?

चक्का तयार झाल्यानंतर तो एका पातेल्यात घेऊन फेटून घ्यावा. साधारणपणे चक्का पातळ होईल इतपत फेटावा. त्यात कोणतीही गुठळी राहता कामा नये. चक्का फेटून झाल्यावर त्यात तुमच्या चवीनुसार अंदाजे साखर घालावी व तुम्हाला आवड असल्यास त्या सुकामेवा किंवा फळांच्या बारीक फोडी करुन घालाव्यात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The back burner easy homemade shrikhand recipe ssj

ताज्या बातम्या