वडाच्या सालाचा काढा आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या कसा बनवायचा

वडाच्या सालापासून काढा तयार केला जातो जो आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. जाणून घ्या याच्या सेवनाने शरीराला कसे फायदे होतात.

वडाच्या सालाचा काढा आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या कसा बनवायचा
वडाच्या सालाचा काढा आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर आहे ( फोटो : प्रातिनिधिक )

हिंदू धर्मात वटवृक्षाला महत्वाचं स्थान आहे. हिंदू लोक वटवृक्षाला देव मानतात आणि त्याची पूजा देखील करतात. वडाचे झाड वर्षानुवर्षे जगते. लोक फक्त वटवृक्षाची पूजाचं करतात असं नाही, तर वटवृक्षात असे देखील काही औषधी गुणधर्म आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी रामबाण औषध आहेत. होय, वडाच्या पानांचा, त्याच्या दुधापासून ते या झाडाच्या सालापर्यंत आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. तर आज आम्ही तुम्हाला वटवृक्षाच्या सालाचे काय फायदे आहेत आणि आपण ते काढ्याच्या रूपात कसे वापरू शकता हे सांगणार आहोत.

वडाच्या सालाच्या काढ्याचे फायदे

वडाच्या सालामध्ये थिओसायनिडिन्स, केटोन्स, फिनॉल्स, टॅनिन, सॅपोनिन्स, स्टेरॉल्स, फ्लेव्होनॉइड्स असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

१) खोकल्यापासून आराम मिळतो

सर्दी, खोकल्याच्या समस्येवर वडाच्या सालाचा रस प्यायला जातो. याशिवाय, ब्राँकायटिससाठी देखील याचा वापर केला जातो. हा काढा प्यायल्यास खोकला आणि सर्दी पूर्णपणे निघून जाते.

२) झोपेच्या समस्यांना लाभकारी

वडाच्या सालाचा काढा प्यायल्याने झोपेचा त्रास कमी होतो. जर तुम्ही दिवसातून दोनदा म्हणजेच सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी वडाच्या सालाचा काढा सेवन केलात तर तुम्हाला तणावापासून आराम मिळेल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.

३) केस गळती थांबते

वडाच्या सालानेही केस गळणे कमी करता येते. यासाठी वडाची साल पाण्यात उकळा आणि आठवड्यातून एकदा या पाण्याने केस धुवा. यामुळे केसगळती थांबवता येते आणि केस गळतीची समस्या देखील पुन्हा उद्भवणार नाही.

वडाच्या सालाचा काढा बनवायचा कसा?

हा काढा बनविण्यासाठी फक्त १ लिटर पाणी घ्या. त्यात २-३ चमचे वडाच्या सालीची पावडर टाका. हे पाणी गॅसवर ठेवा आणि किमान ५ ते ७ मिनिटे चांगले उकळू द्या. हे पाणी अर्धवट राहिल्यावर गॅस बंद करा. आता या काढ्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार मध घालून सेवन करू शकता. तज्ञांच्या मते, तुम्ही दिवसाला ५०० ते १०० मिलीग्राम वडाच्या सालाचा काढा पिऊ शकता. अशा स्थितीत तुम्ही ५०० मिलीग्राम वडाच्या सालाचा काढा सकाळी रिकाम्या पोटी आणि ५०० मिलीग्राम रात्री झोपण्यापूर्वी पिऊ शकता. त्याने तुम्हाला बराच फायदा मिळेल. तसंच तुमच्या आरोग्या संबंधित समस्याही दूर होतील.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The bark of the banyan tree juice is very beneficial for health learn how to make gps

Next Story
Long Distance Relationship मध्ये ‘या’ चुका विसरुनही करू नका; होऊ शकते मोठे नुकसान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी