Avoid These Foods With Spinach: पालक ही अशी एक भाजी आहे जी पोषक तत्वांनी भरपूर आहे. अनेक पदार्थ एकत्र करून आपण पालकाचे सेवन करतो. पालक पनीर खाणे लोकांना प्रचंड आवडते. पालक पनीरचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. पालक पनीर खूप चविष्ट आहे. पालक पनीर बहुतेकदा उत्तर भारतीयांच्या ताटात दिसतो. पालक पनीर केवळ चवीनुसारच नाही तर पौष्टिक घटकांनी परिपूर्ण पदार्थ आहे.

पालकामध्ये लोह, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर आणि इतर अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, तर पनीरमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. पालक आणि पनीर दोन्ही हाडे मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट आहेत. या दोन्हीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. इतके फायदे असूनही पोषणतज्ञ पालक पनीर एकत्र खाणे योग्य मानत नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की पालक पनीर एकत्र खाल्ल्याने त्याचे पौष्टिक मूल्य नष्ट होते.

loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
What Happens To Body By Drinking One Glass Milk Everyday
एक ग्लास दूध रोज प्यायल्याने तुमच्या शरीराला फायदा होतोय की त्रास, कसे ओळखाल? शरीराचं कसं ऐकाल?

पालकासोबत काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. पोषणतज्ञ नमामी अग्रवाल यांनी इंस्टाग्रामवर सांगितले की, पालक जर काही पदार्थांसोबत खाल्ल्यास त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. चला जाणून घेऊया पालकासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत.

( हे ही वाचा: युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने कमी होईल; फक्त ‘या’ ४ पदार्थांचा आहारात समावेश करा)

पालकासोबत पनीर खाल्ल्याने आरोग्य कसे बिघडते?

पोषणतज्ञ नमामी अग्रवाल इंस्टाग्रामवर सांगितले की पालकासोबत पनीरचे सेवन करू नये. नमामी अग्रवाल यांनी सांगितले की काही अन्नपदार्थ एकटेच खाणे फायदेशीर असते, परंतु जेव्हा ते दुसर्‍या पदार्थात मिसळले जाते तेव्हा दुसऱ्या अन्नाचा फायदा होणार नाही. कारण दोन पौष्टिकतेने समृद्ध असलेले अन्न एकमेकांमधील पोषक तत्वे शोषून घेतात. पालक पनीर एकत्र करून भाजी करणे योग्य नाही.

तज्ज्ञांच्या मते, हेल्दी फूड म्हणजे फक्त योग्य अन्न खाणे असा नाही तर ते योग्य मिश्रणाने खाणे आवश्यक आहे, तरच आपल्याला दोन्हीमध्ये पोषक तत्वे मिळतात. पालकमध्ये भरपूर लोह असते तर पनीरमध्ये कॅल्शियम भरपूर असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास कॅल्शियम पोटात लोह शोषण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे पालकामध्ये उपस्थित असलेले लोह मिळविण्यासाठी पालकामध्ये बटाटे किंवा कॉर्न घालावे, पनीर घालू नये.

( हे ही वाचा: आता मधुमेहापासून होणार कायमची सुटका? बाबा रामदेव यांनी सांगितलेला असरदार उपाय जाणून घ्या)

पालकासोबत तिळाचे सेवन करू नका

हिवाळ्यात, लोक शरीराला उबदार ठेवण्यासाठी गरम प्रभाव असलेले पदार्थ खातात. तीळ हे देखील असे अन्न आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे अन्न पालकासोबत खाल्ल्यास तुमची पचनक्रिया बिघडू शकते. पालकामध्ये तीळ घातल्याने जेवणाची चव तर वाढतेच, पण त्याचे सेवन केल्याने अतिसाराचा धोका वाढू शकतो.

पालकासोबत दुधाचे सेवन करू नका

दुधात कॅल्शियम असते आणि पालकात ऑक्सॅलिक ऍसिड असते. या दोन पदार्थांच्या मिश्रणामुळे किडनी ब्लॉक होण्याचा धोका वाढू शकतो. ऑक्सलेट्स हे लहान संयुगे आहेत जे कॅल्शियमशी बांधले जातात आणि ते शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात. हवामान बदलल्यावर सर्दी आणि कफ दूर करण्यासाठी अनेकदा लोक दुधासोबत पालकाचे सेवन करतात. हे पदार्थ टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.