सौरकृषी पंपाचे महत्व वाढले, योग्य नियोजनामुळे शेती उत्पादनातही भरघोस वाढ

सौर कृषी पंपांना बसवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या माणसांची आवश्यकता पडत नाही.

lifestyle
सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंप मोफत मिळणाऱ्या सूर्य प्रकाशापासून चालतो.( photo: financial express)

शेती करणे म्हणजे एक अवघड प्रक्रिया आहे.परंतु शेतामध्ये जर कृषी यंत्रांच्या वापर केला तर शेती करण्यामध्ये येणाऱ्या समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होतात. तसेच दिवसभर राबणार्‍या शेतकरी वर्गाला शेती व्यवसायात भरपूर कष्ट करून देखील योग्य मोबदला मिळत नाही. त्याचबरोबर काळाच्या ओघात आता शेतीपध्दतीमध्ये अनेक बदल होत चालेले आहे. पण प्रत्येक बदल स्वीकारावा अशी देशातील शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नाही पण जे आवश्यक आहे त्यामध्ये तर बदल करावाच लागणार आहे. यात शेतकर्‍यांना अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्याच अनुशंगाने सिंचन हे महत्वाचे आहे. त्यामुळे सौर कृषी पंपाचे फायदे काय आहेत याची माहिती जाणून घेऊयात.

सौर कृषी पंपाचे फायदे

सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंप मोफत मिळणाऱ्या सूर्य प्रकाशापासून चालतो. तसेच या सौर उर्जेचा शेतकर्‍यांना वीज आणि डिझेलसारख्या महागड्या इंधनांवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. तसेच या सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपाला चालवण्यासाठी पुन्हा-पुन्हा पैसे टाकायची गरज भासत नाही. सूर्यप्रकाशामुळे सोलर पॅनल चार्ज होते. त्यामुळे गरजेनुसार सौर कृषी पंपला चालवून पाण्याचा उपयोग करू शकतो.

सौर कृषी पंप लावल्यानंतर इतर ऊर्जास्रोतांची गरज राहत नाही. सौर कृषी पंपासाठी फक्त सूर्य प्रकाश आणि सोलर पॅनलची आवश्यकता असते. याद्वारे शेतकरी कुठल्याही कोपऱ्यात पिकांना पाणी पोहोचू शकतो. सौर कृषी पंप यांच्या वापरामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणात आत्मनिर्भर होत आहेत.

सौर कृषी पंपाच्या वापरामुळे जास्त खर्च येत नाही. सौर त्यामुळे तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा ऊर्जा ग्रेडला विकून उत्पन्नात एक चांगला स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

सौर ऊर्जेच्या मदतीने कृषी पंप चालवणे फार सोपे आहे. कारण यामध्ये फार कमी प्रमाणात उपकरणांची आवश्यकता असते. तसेच पारंपारिक कृषी पंपप्रमाणे विजेची कपात, कमी होल्टेज यासारख्या समस्या येत नाहीत. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही, त्याठिकाणी सौर कृषी पंप एक वरदान ठरत आहेत.

सौर कृषी पंपामुळे कुठल्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. हे पर्यावरणासाठी अनुकूल आहे. कारण सौर कृषी पंपाला अशा कुठल्याही इंधनाने चालवले जात नाही, ती त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होईल. या कृषी पंपाद्वारे कुठलाही हानिकारक पदार्थ वातावरणात सोडला जात नाही. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचा समस्या दूर होते.

उन्हाळ्यामध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यामध्ये सोलर पॅनल जास्त उन्हामुळे भरपूर प्रमाणात चार्ज होतात. तसेच पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सोलर एनर्जी कमी प्रमाणात तयार होते. तेव्हा तुम्ही पाण्याचा स्टोर करून ठेवू शकता.

सौर कृषी पंपांना बसवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या माणसांची आवश्यकता पडत नाही. जर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सौर कृषी पंपाचे स्थलांतर करायचे असेल त्तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The importance of solar agricultural pumps has increased and due to proper planning there has been a huge increase in agricultural production scsm

ताज्या बातम्या