scorecardresearch

म्युच्युअल फंडात गुंतवणूक ‘या’ मार्गानेच करता येणार; १ एप्रिलपासून नवा नियम, जाणून घ्या

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पेमेंटची पद्धत १ एप्रिलपासून बदलणार आहे.

mutual-fund-investment
म्युच्युअल फंडात गुंतवणूक 'या' मार्गानेच करता येणार; १ एप्रिलपासून नवा नियम, जाणून घ्या

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पैसे भरण्याची पद्धत १ एप्रिलपासून बदलणार आहे. आतापर्यंत, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी धनादेश, बँक ड्राफ्ट किंवा इतर माध्यमाद्वारे पैसे दिले जात होते. मात्र १ एप्रिलपासून असे होणार नाही. म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन एग्रीगेशन पोर्टल एमएफ युटिलिटीज ३१ मार्च २०२२ पासून चेक आणि डीडीद्वारे गुंतवणुकीसाठी पैसे देण्याची सुविधा बंद करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पैसे देण्यासाठी इंटरनेट बँकिंग आणि UPI पेमेंटचा पर्याय शिल्लक राहील.

NEFT आणि RTGS द्वारे देखील पेमेंट केले जाणार नाही : धनादेश आणि डीडी व्यतिरिक्त म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन एग्रीगेशन पोर्टल एमएफ युटिलिटीजने NEFT आणि RTGS द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धतीवर देखील बंदी घातली आहे. या संदर्भात एमएफ युटिलिटीजने सांगितले की, सिस्टम अपडेट केल्यानंतर आता जुन्या पद्धतीनुसार म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पैसे भरता येणार नाहीत. आत्तापर्यंत गुंतवणुकीचे पेमेंट चेक, ड्राफ्ट, ट्रान्सफर लेटर, बँकर्स चेक, पे ऑर्डर इत्यादी पर्यायांद्वारे केले जात होतं.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, करोना महामारीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पैसे देण्याची पद्धत फार पूर्वी बदलली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोशल डिस्टन्सिंगमुळे बहुतेक ग्राहक UPI आणि नेट बँकिंगद्वारे गुंतवणूकीसाठी पैसे देत आहेत. त्यामुळे चेक, डीडी, आरटीजीएस आणि एनईएफटी पर्याय बंद केल्याने फारसा परिणाम होणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The method of paying for investments in mutual funds will change from april 1 rmt

ताज्या बातम्या