World Most Expensive Paneer: भारतीय स्वयंपाकघरात पनीरला विशेष स्थान आहे. विशेषतः शाकाहारी लोकांच्या जेवणात पनीर हे आवर्जून असते. नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत, पनीरचे अनेक पदार्थ आहेत, ज्यांची मोजणी करणे कदाचित सोपे नाही. त्याचबरोबर आता चायनीज फूडमध्येही पनीरचा वापर केला जात आहे. त्यामुळे पनीरची मागणी आणखी वाढली आहे. पण तुम्हाला माहितीये का, की जगातील सर्वात महाग पनीर कोणते आहे आणि ते किती रुपयांना असेल? सर्वात महाग पनीर आणि त्याची किंमत जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात महाग पनीर आणि त्याच्या किंमतीबद्दल.

सर्वात महाग पनीर

तुम्ही दररोजच्या जेवणात महागातले महाग पनीर खाल्ले असेल, मात्र ७० हजार रुपये किलोने विकले जाणारे पनीर कधी खाल्ले आहे का? होय, जगातील सर्वात महाग पनीरची किंमत चक्क ७०,००० आहे. मात्र, हे पनीर महाग असण्यामागे देखील कारण देखील तितकंच महत्वाचं आहे. जगातील सर्वात महाग पनीर गाढवाच्या दुधापासून बनविले जाते. त्यामुळे या पनीरची किंमत एवढी महाग आहे. गाढवाच्या दुधापासून बनविले जाणारे पनीर सर्वात स्वादिष्ट तसेच चांगले असते. त्यामुळे गाढवाच्या दुधापासून बनविल्या जाणाऱ्या पनीरची किंमत एवढी महाग आहे.

Divorce tendency of financially capable women
सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल
Do you know Swordbilled hummingbird The title bird with the longest beak in the world read about this everything
जगातील सर्वात लांब चोच असणारा पक्षी कोणता माहितीय का? जाणून घ्या….
worlds clearest water
काचेसारखे पारदर्शक ‘या’ तलावाचे पाणी; पण स्पर्शालाही बंदी! कारण काय…?
What is the hottest place on earth
पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? येथे माणूस राहू शकतो का? जाणून घ्या येथे किती आहे तापमान?

(हे ही वाचा: अंडी उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देताय?; जाणून घ्या या पाण्याचे आश्चर्यकारक फायदे)

सर्बियाई पनीर इतके महाग का असते?

जगातील सर्वात महाग पनीरची किंमत पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. या पनीरला सर्बियाई पनीर म्हणून देखील ओळखले जाते. सर्बियाई पनीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पनीरची किंमत एक किलोसाठी ८०० डॉलर म्हणजेच सुमारे ७०,००० रुपये आहे. एका किलोग्रॅमसाठी ७० हजार किंमत असलेले, हे जास्त किमतीचे पनीर झासाविका येथे बनवले जाते, जे सर्बियाच्या सर्वात प्रसिद्ध नैसर्गिक साठ्यांपैकी एक आहे. या पनीरला पुले असेही म्हणतात, जे गाढवाच्या दुधापासून बनवले जाते. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गाढवाचे सुमारे २५ लीटर ताजे दूध मंथन करून फक्त १ किलो पनीर बनवले जाते, म्हणूनच ते जगातील सर्वात महाग पनीर म्हणून ओळखले जाते.

हे पनीर कसे असते

या पनीरच्या टेक्सचरबद्दल बोलायला गेलं तर, ते क्रीमी आणि थोडे घट्ट असते.अभ्यासानुसार, गाढवाच्या दुधात प्रथिने भरपूर असतात, ज्याचा खूप चांगला अँटीमायक्रोबियल प्रभाव असतो. वास्तविक, विषाणू आणि बॅक्टेरियामुळे होणारे पोटाचे आजार या दुधाच्या सेवनाने कमी होऊ शकतात. हे दूध हाडांसाठी देखील चांगले आहे आणि चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस मदत करते तसेच हे आतड्यांसाठी देखील चांगले आहे. त्यामुळे गाढवाच्या दुधापासून बनवलेले पनीर नक्कीच ट्राय करून बघा.

( हे ही वाचा: गायीचं की म्हशीचं? जाणून घ्या कोणतं तूप आरोग्यासाठी अधिक फायदेशीर)