World Most Expensive Paneer: जगातील सर्वात महाग पनीरची किंमत आहे तब्बल आहे ७० हजार रुपये प्रति किलो! जाणून घ्या काय आहे यामागचं कारण

शाकाहारी लोकांना सर्वात आवडणारा पदार्थ म्हणजे पनीर. पण तुम्हाला सर्वात महाग पनीरच्या किंमतीबद्दल माहितीये का? जाणून घ्या.

World Most Expensive Paneer
जगातील सर्वात महाग पनीरची किंमत माहितीये का( फोटो: pexels)

World Most Expensive Paneer: भारतीय स्वयंपाकघरात पनीरला विशेष स्थान आहे. विशेषतः शाकाहारी लोकांच्या जेवणात पनीर हे आवर्जून असते. नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत, पनीरचे अनेक पदार्थ आहेत, ज्यांची मोजणी करणे कदाचित सोपे नाही. त्याचबरोबर आता चायनीज फूडमध्येही पनीरचा वापर केला जात आहे. त्यामुळे पनीरची मागणी आणखी वाढली आहे. पण तुम्हाला माहितीये का, की जगातील सर्वात महाग पनीर कोणते आहे आणि ते किती रुपयांना असेल? सर्वात महाग पनीर आणि त्याची किंमत जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात महाग पनीर आणि त्याच्या किंमतीबद्दल.

सर्वात महाग पनीर

तुम्ही दररोजच्या जेवणात महागातले महाग पनीर खाल्ले असेल, मात्र ७० हजार रुपये किलोने विकले जाणारे पनीर कधी खाल्ले आहे का? होय, जगातील सर्वात महाग पनीरची किंमत चक्क ७०,००० आहे. मात्र, हे पनीर महाग असण्यामागे देखील कारण देखील तितकंच महत्वाचं आहे. जगातील सर्वात महाग पनीर गाढवाच्या दुधापासून बनविले जाते. त्यामुळे या पनीरची किंमत एवढी महाग आहे. गाढवाच्या दुधापासून बनविले जाणारे पनीर सर्वात स्वादिष्ट तसेच चांगले असते. त्यामुळे गाढवाच्या दुधापासून बनविल्या जाणाऱ्या पनीरची किंमत एवढी महाग आहे.

(हे ही वाचा: अंडी उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देताय?; जाणून घ्या या पाण्याचे आश्चर्यकारक फायदे)

सर्बियाई पनीर इतके महाग का असते?

जगातील सर्वात महाग पनीरची किंमत पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. या पनीरला सर्बियाई पनीर म्हणून देखील ओळखले जाते. सर्बियाई पनीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पनीरची किंमत एक किलोसाठी ८०० डॉलर म्हणजेच सुमारे ७०,००० रुपये आहे. एका किलोग्रॅमसाठी ७० हजार किंमत असलेले, हे जास्त किमतीचे पनीर झासाविका येथे बनवले जाते, जे सर्बियाच्या सर्वात प्रसिद्ध नैसर्गिक साठ्यांपैकी एक आहे. या पनीरला पुले असेही म्हणतात, जे गाढवाच्या दुधापासून बनवले जाते. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गाढवाचे सुमारे २५ लीटर ताजे दूध मंथन करून फक्त १ किलो पनीर बनवले जाते, म्हणूनच ते जगातील सर्वात महाग पनीर म्हणून ओळखले जाते.

हे पनीर कसे असते

या पनीरच्या टेक्सचरबद्दल बोलायला गेलं तर, ते क्रीमी आणि थोडे घट्ट असते.अभ्यासानुसार, गाढवाच्या दुधात प्रथिने भरपूर असतात, ज्याचा खूप चांगला अँटीमायक्रोबियल प्रभाव असतो. वास्तविक, विषाणू आणि बॅक्टेरियामुळे होणारे पोटाचे आजार या दुधाच्या सेवनाने कमी होऊ शकतात. हे दूध हाडांसाठी देखील चांगले आहे आणि चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस मदत करते तसेच हे आतड्यांसाठी देखील चांगले आहे. त्यामुळे गाढवाच्या दुधापासून बनवलेले पनीर नक्कीच ट्राय करून बघा.

( हे ही वाचा: गायीचं की म्हशीचं? जाणून घ्या कोणतं तूप आरोग्यासाठी अधिक फायदेशीर)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The price of the most expensive cheese in the world is as high as rs 70000 per kg find out what is the reason behind this gps

Next Story
Noodles Boiling Tips: नूडल्स चिकट होण्यापासून रोखण्यासाठी, अशा प्रकारे उकळवा; जाणून घ्या स्टेप्स
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी