हृदय हे आपल्या शरीराचे महत्वाचे अवयव आहे. याची क्रिया सतत सुरु असते. परंतु अयोग्य आहार आणि जीवनशैली आपल्या हृदयाला इजा पोहचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यातच हिवाळ्यात हृदयविकाराच्या समस्यांमध्ये वाढ होते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधित तक्रारी अधिक जाणवतात. हिवाळ्यात जसजसे तापमान कमी होऊ लागते तसे शरीरातील तापमान कायम ठेवण्यासाठी हृदयाला अतिरिक्त मेहनत करावी लागते.

जेव्हा हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होते, तेव्हा आपली सहानुभूतीशील मज्जासंस्था सक्रिय होऊन कॅटेकोलामाइन्सचा स्राव वाढवू शकते. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात ज्यामुळे हृदय गती, रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढू शकते. या गोष्टी हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत ठरतात. अशातच थंडीच्या दिवसात हृदय निरोगी कसे ठेवू शकतो या संबंधी कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार-इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी डॉ. झाकिया खान यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

उच्च रक्तदाब ते मधुमेह कंट्रोल करण्यासाठी उत्तम आहे अंजीर; जाणून घ्या इतर फायदे

सतत तणावात राहू नये

तणाव हे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांचे मुख्य कारण आहे. तीव्र तणावमुळे थेट हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तीव्र तणावामुळे हृदयाच्या धमन्यांच्या आतील अस्तरात बदल होऊन छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे रक्त गोठू शकते तसेच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

मनाला आनंद मिळेल असे काम करावे

गाणी ऐकणे, पुस्तक वाचन, माळी काम, चित्रकला अशा गोष्टी केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच योग आणि ध्यान केल्याने देखील फायदा होऊ शकतो.

भरपूर झोप घ्यावी

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर कामात असताना अधून-मधून ब्रेक घेणे गरजेचे आहे.

ओमायक्रॉन संक्रमणापासून बचाव करायचा आहे? तर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश कराच

नियमित व्यायाम करावा

दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम करावा. थंडीच्या दिवसात बाहेर जाऊन व्यायाम करणे टाळावे. यामुळे आपल्याला थंडी वाजू शकते. या दिवसात घरातल्या घरात करता येऊ शकणारे व्यायाम करावेत.

जास्त मीठ आणि साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे

अन्नामध्ये सूर्यफूल तेल किंवा मोहरीचे तेल वापरा. ते पॉलीअनसॅच्युरेटेड असते. तुमच्या रोजच्या जेवणात सलाड आणि फळांचा समावेश करा.