मद्यपान करणे हे प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक आवड आणि निवड असली तरी पण मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहित आहे. मद्यपान करताना सहसा खारे शेंगदाणे किंवा मसालेदार स्नॅक्स दिले जातात. पण असे का केले जाते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का. मद्यपान आणि खारे दाणे हे कॉम्बिनेशन इतके प्रसिद्ध का आहे? आता घरातील पार्टीमध्येही लोक खारट शेंगदाणे आणि इतर चवदार स्नॅक्ससह ड्रिंक्सबरोबर देतात पण यामागील शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का?
मद्यपान करताना खारे शेंगदाणे का दिले जातात?
TOIच्या वृत्तानुसार, मीठामध्ये पाणी शोषून घेण्याची तीव्र प्रवृत्ती असते आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही खारट स्नॅक्स खाता तेव्हा ते तोंड आणि घशातील ओलावा शोषून तुमचे तोंड कोरडे करते आणि त्यामुळे तुम्हाला आणखी तहान लागते. तज्ञांच्या मते, मद्याबरोबर खारे दाणे देणे ही देखील बारची एक व्यावसायिक रणनीती आहे, कारण जेव्हा तुम्ही जास्त खारे दाणे खाता तेव्हा तुम्हाला जास्त तहान लागते आणि आपोआपच तुम्ही अधिक पेये ऑर्डर केले जाते आणि त्याचां फायदा होतो.
खारे दाण्यांमुळे कडू मद्य पिणे होते सोपे
मद्याची चव अनेकदा कडू असते आणि जेव्हा तुम्ही मीठ खाता तेव्हा मेंदूतील रिसेप्टर्स कडू चव तात्पुरती कमी होते आणि त्यामुळे कडू मद्य पिणे सोपे होते. जर तुम्ही निरीक्षण केले नसेल तर, पुढच्या वेळी तुम्ही प्याल तेव्हा काही खारट शेंगदाणे खाऊन पाहा आणि तुमच्या लक्षात येईल की, कडू चवीचे मद्य पिणे अधिक सोपे आहे
हेही वाचा – अतितणावामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू? अतिताणाचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो?
मीठ आणि मद्य एकमेकांना पूरक आहेत
मीठ आणि अल्कोहोल यांचे मिश्रण एकमेकांना पूरक असल्याचे आढळून आले आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मद्यपान करताना मिठाचे पदार्थांमुळे त्याची चव आणखी चांगली लागते. त्यामुळे तुम्ही अधिक खारे दाणे किंवा स्नॅक्स खाता आणि परिणामी आणखी मद्यपान करता.
हेही वाचा – तुमच्या मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा….
मद्यपान करताना खारेदाण्याशिवाय चिप्स किंवा कुरकुरे यांसारखेर मसालेदार आणि खारे पदार्थही दिले जातात.