२१ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे. श्राद्ध पक्ष पूर्वजांच्या स्वयंसिद्धीसाठी समर्पित केला जातो. पितृ पक्षात, पूर्वजांच्या आत्म-समाधानासाठी, पिंड दान, तर्पण, पूजा इत्यादी कार्य केले जातात. या दिवसात असे मानले जाते की पितृ पक्षाच्या वेळी आपल्या पूर्वजांचे आत्मा पृथ्वीवर येतात. त्यांना अन्न, दान, तर्पण इत्यादी त्यांच्या आत्मशांतीसाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी हे केले जातात. तसेच आपल्याला कौटुंबिक वाढ, संपत्ती, शिक्षण, समृद्धी आणि प्रगतीसह आशीर्वाद देतात.

पितृ पक्षाबद्दल लोकांच्या मनात एक गोष्ट कायम आहे, ती म्हणजे या दिवसात खरेदी करायची की नाही. पितृ पक्षात खरेदी करणे अशुभ असल्याने बरेच लोक कोणतेही वस्तु खरेदी करत नाहीत. पितृ पक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याची वेळ असते. या दिवसात मात्र तुम्ही लग्न, दाढी करणे इत्यादी मांगलिक कार्ये केली जात नाहीत. परंतु पितृ पक्षात पूजा आणि कोणत्याही वस्तु खरेदीला मनाई केली जात नाही.

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

पूर्वजांच्या आत्म-समाधानासाठी, श्राद्ध पक्षात केलेल दान आणि पूजेला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध पक्षाच्या या १५ दिवसात तुम्ही नवीन वस्तू खरेदी करू शकता. या दिवसात तुम्ही कोणतीही वस्तु खरेदी केल्यावर दोष लागत नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की, पितृ पक्षात नवीन वाहन, घर, कपडे इत्यादी खरेदी केल्यास पूर्वजांना राग येईल आणि त्याचा दोष लागतो. मात्र असं काही नसत. पूर्वजांनी दिलेल्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख लाभावे म्हणून तुम्ही नवीन वस्तु खरेदी करू शकतात. अशाने पूर्वजांच्या आनंदामुळेच तुमच्या घरात आनंद येतो.

(टीप: आमचा हेतू फक्त माहिती पोहचवणे आहे, त्याचा वाचकांनी फक्त माहिती अंतर्गत घ्यावी. या व्यतिरिक्त, वरील महितीच्या वापराची जबाबदारी स्वतः वाचकांची असेल.)