10 Vegetables Diabetics: मधुमेह ही एक सामान्य समस्या आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरातील इन्सुलिन नावाच्या हार्मोनचे असंतुलन. जेव्हा आपण काही खातो, तेव्हा आपले शरीर त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते, जे आपल्याला ऊर्जा देते. पोटाजवळ असलेले स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते, जे ही साखर शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम करते; परंतु जेव्हा या प्रणालीमध्ये बिघाड होतो. तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते आणि व्यक्ती मधुमेहाची बळी ठरते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या १० भाज्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
मधुमेहींनी आवर्जून करा ‘या’ भाज्यांचे सेवन
१) कारले – शरीराला ग्लुकोजचा चांगल्या प्रकारे वापर करण्यास मदत करते आणि मधुमेहासाठी सर्वाधिक संशोधन झालेल्या भाज्यांपैकी एक आहे.
२) तोंडली – ही भाजी जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामध्ये अशी संयुगे आणि एंझाइम्स असतात, जे शरीरातील ग्लुकोज चयापचय सुधारतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो.
३) गवारी – गवारीमध्ये एक विद्राव्य फायबर असून, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची प्रक्रिया मंदावण्यास मदत करते.
४) शेवगा – मधुमेहींसाठी शेवग्याला ‘सुपरफूड’ मानले जाते. ही भाजी स्टार्चचे ग्लुकोजमध्ये होणारे रूपांतर मंदावण्यास मदत करते.
५) पालक – पालक ही मधुमेहींसाठी आणखी एक उत्कृष्ट आणि गुणकारी भाजी आहे. पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाजीला आयुर्वेदात औषधी वनस्पती मानले जाते.
६) पडवळ – पडवळ ही मधुमेहींसाठी एक अत्यंत सुरक्षित व फायदेशीर भाजी आहे आणि ती पचायला हलकी असते. आयुर्वेदात ही भाजी अनेक आजारांवर एक उत्तम उपाय मानली जाते. त्यामुळे शरीराला ग्लुकोज अधिक प्रभावीपणे हाताळण्यास मदत होते.
७) दोडका – दोडका हा मधुमेहींसाठी आणखी एक अमृतासारखा आहे. त्यामुळे ग्लुकोजचे व्यवस्थापन आणि त्याचा वापर अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.
८) कच्ची पपई – कच्च्या पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खूप कमी असतो. त्यामुळे ग्लुकोजची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो.
९) पांढरा भोपळा – पांढन्या भोपळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड खूप कमी असतो.
१०) भेंडी – त्यामध्ये असलेले विद्राव्य फायबर साखरेचे शोषण मंदावण्यास मदत करते.
तज्ज्ञांच्या मते, कोणतीही एक भाजी मधुमेह बरा करू शकत नाही. परंतु, आहारात या भाज्यांचा नियमित समावेश केल्यास रक्तातील साखरेचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते.
