Lung Cancer Symptoms marathi: फुप्फुसांचा कॅन्सर, ज्याला लंग्स कॅन्सर किंवा फुप्फुस कार्सिनोमा, असेही म्हटले जाते. हा एक अत्यंत गंभीर व जीवघेणा आजार आहे. या आजारामध्ये फुप्फुसांमध्ये असामान्य पेशी अनियंत्रित वेगाने वाढू लागतात. लंग्स कॅन्सर फुप्फुसांमध्येच सुरू होतो किंवा शरीरातील दुसऱ्या भागातून येथे पसरतो. जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुप्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे.

धूम्रपान, प्रदूषण, रासायनिक पदार्थांशी संपर्क, चुकीची आहारशैली व अनारोग्यकालख जीवनशैली ही या कॅन्सरची प्रमुख कारणे मानली जातात. फुप्फुसाचा कर्करोग हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. सध्या, फुप्फुसाच्या कर्करुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जे धूम्रपान करतात, त्यांना फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक पटींनी असतो. तरीही फुप्फुसाचा कर्करोग धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्येही दिसून येतो. 

लवकर निदान झाल्यास यावर उपचार शक्य असतात, जसे की सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन, टार्गेटेड थेरपी व इम्युनोथेरपी. महत्त्वाचं म्हणजे, लंग्स कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला अतिशय सूक्ष्म असतात आणि बहुतेक वेळा दुर्लक्षित केली जातात. फुप्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अगदी सामान्य आहेत, जी सामान्य सर्दीसारखी दिसतात. ज्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तो ओळखणे खूप कठीण आहे. अशी सामान्य लक्षणे पाहून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि कर्करोग फुप्फुसातून संपूर्ण शरीरात वेगाने पसरू लागतो आणि आपण कर्करोगाला बळी पडतो. मात्र, योग्य वेळीच ही चिन्हे ओळखली गेली, तर जीव वाचवणं शक्य आहे. पाहूया अशीच सुरुवातीची पाच लक्षणं:

१. खांद्यामध्ये वेदना

जर खांदा किंवा हातात कायमस्वरूपी, पेनकिलर्सनेही न बऱ्या होणाऱ्या वेदना होत असतील, तर त्या फुप्फुसाच्या वरच्या भागात तयार होणाऱ्या Pancoast Tumour मुळे असू शकते.

२. आवाजात बदल

जर आवाज सतत भरकटलेला, फाटलेला वाटत असेल किंवा कमी शक्तीचा वाटत असेल, तर ते फुप्फुसातील ट्यूमरमुळे आवाजाच्या रेषेवर होणाऱ्या दबावामुळे असू शकते.

३. एका डोळ्याची पापणी झुकणं

हा Horner’s Syndrome चा संकेत असू शकतो, जेव्हा फुप्फुसाच्या भागातील ट्यूमर नर्व्हवर दाब देतो. तेव्हा हे लक्षण सौम्य आणि वेदनारहित असल्याने लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

४. बोटांचा आकार बदलणं

जर बोटे फुगत असतील, नख वाकडी होऊन झुकत असतील, तर ते finger clubbing चे लक्षण असू शकते. जे शरीरात ऑक्सिजनची कमतरता दर्शवते.

५. कायमस्वरूपी थकवा

अस्वस्थपणा, झोप पूर्ण झाली असूनही न संपणारा थकवा जाणवत असेल तर हे cancer fatigue असू शकतं, जे शरीरातील cytokines मुळे होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्षात ठेवा- ही लक्षणं सामान्य वाटू शकतात; पण ती वेळीच ओळखणं अत्यावश्यक आहे.