scorecardresearch

Weight Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात बटाट्यासह ‘या’ ५ पदार्थांचा करा समावेश, जाणून घ्या

आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे, जे आपल्याला अधिक पोषक तत्त्वे देतात आणि आपले वजन निरोगी मार्गाने वाढवतात.

वजन वाढवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करावा. (photo credit: freepik)

काही लोकं वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात, तर काही लोकं वजन वाढत नसल्याने चिंतेत असतात. वजन कमी करण्यासाठी लोकांना खूप सल्ले मिळतात, पण वजन वाढवण्यासाठी कोणतीही वैज्ञानिक पद्धत सापडत नाही. वजन वाढवण्यासाठी तुम्ही जास्त खात असाल, तरीही वजन वाढत नसेल, तर सर्वप्रथम तुमच्या आहाराकडे लक्ष द्या.

आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे, जे आपल्याला अधिक पोषक तत्त्वे देतात आणि आपले वजन निरोगी मार्गाने वाढवतात. चला जाणून घेऊया वजन वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

आहारात बटाट्याचा समावेश करा

वजन वाढवायचे असेल तर कार्बोहायड्रेट्सचा आहारात समावेश करा. बटाटे कार्बोहायड्रेट्स आणि जटिल शर्करामध्ये समृद्ध असतात, जे झपाट्याने वजन वाढण्यास मदत करतात. वजन वाढवायचे असेल तर दररोज एक तरी बटाट्याचे सेवन करा.

केळी खा

वजन वाढवायचे असेल तर दिवसातून ३-४ केळी खा. नाश्त्यासाठी केळीचा शेक बनवूनही तुम्ही केळीचे सेवन करू शकता. पोषक तत्वांनी समृद्ध, केळी तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवते, तसेच वजन झपाट्याने वाढवते.

तुपाचे सेवन करा

वजन वाढवायचे असेल तर आहारात तुपाचा समावेश करा. तुपामध्ये भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते. तुम्ही मसूर, भाजी आणि रोटीमध्ये तूप वापरू त्याचे सेवन करू शकता.

दुधासोबत या ३ गोष्टी खा

वजन वाढवण्यासाठी, दिवसभर खाण्यापेक्षा वजन वाढवणाऱ्या गोष्टी खाणे चांगले. वजन वाढवण्यासाठी अंजीर, खजूर आणि बदामाचा दुधात समावेश करून शेक बनवा व सेवन करा. दुधासोबत या गोष्टींचे सेवन केल्यास शेकची टेस्ट चांगली होते, तसेच शरीराचे वजनही निरोगी होते.

मनुक्याचे सेवन करा

मनुका हे असेच एक ड्राय फ्रूट आहे जे वजन झपाट्याने वाढवण्यात प्रभावी आहे. मनुके दुधात भिजवूनही खाता येतात. दुधात मनुके घालून रात्री झोपण्यापूर्वी प्या, वजन झपाट्याने वाढेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: These 5 healthy foods that can help to gain weight faster scsm

ताज्या बातम्या