गरोदरपणात अॅक्टिव्ह राहिल्याने महिलांची एनर्जी वाढते, मूड चांगला राहतो. गरोदरपणात सक्रिय राहण्यासाठी केवळ चालणेच आवश्यक नाही तर स्त्रिया वर्कआउट देखील करू शकतात. गरोदरपणात स्त्रिया अनेकदा वर्कआउट करायला घाबरतात, मात्र डॉक्टरांच्यामते गरोदरपणात व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात व्यायाम केल्याने गर्भपात होत नाही, तसेच बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. जर तुम्ही गर्भधारणेपूर्वी व्यायाम करत असाल तर गर्भधारणेनंतरही व्यायाम सुरू ठेवा, कोणतीही अडचण येणार नाही.

गरोदरपणात वर्कआउट केल्याने त्याचा तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो. कारण या काळात तुमच्या शरीरात अनेक बदल होतात. तुमचे शरीर पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घेत असते, त्यामुळे तीव्र वर्कआउट्स तुमच्या शरीरात तणाव वाढवू शकतात, त्यामुळे गरोदरपणात तुम्ही कोणते वर्कआउट करू शकता ते जाणून घेऊयात.

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
What Happens To Body By Drinking One Glass Milk Everyday
एक ग्लास दूध रोज प्यायल्याने तुमच्या शरीराला फायदा होतोय की त्रास, कसे ओळखाल? शरीराचं कसं ऐकाल?
Eating Chavalichi Bhaji Can Cure Thyroid
चवळीच्या भाजीने थायरॉईड बरा होतो का? वजन कमी करताना चवळी किती फायद्याची, तज्ज्ञांची स्पष्ट माहिती, वाचा

एरोबिक व्यायाम करा

अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट (ACOG) च्या मते, गर्भवती महिलांनी आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेची एरोबिक क्रिया केल्याने तुमची हृदयगती वाढवण्यास मदत होते.

गरोदरपणात चालणे

गरोदरपणात चालण्याने स्नायू बळकट होतात, तसेच पोटाच्या वाढत्या आकारामुळे तुमची पाठ, कंबर आणि पाय दुखत असतील तर नियमित चालण्यामुळे तुम्हाला यातून आराम मिळतो. गरोदरपणात वजन नियंत्रित राहण्यासाठी चालणे हा एक सोपा मार्ग आहे. दरम्यान गरोदरपणात मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी चालण्याचा एक चांगला फायदा होऊ शकतो. रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी गरोदर महिलांनी नियमित चालायला हवे.

गरोदरपणात योगा करा

जर महिलांनी गरोदरपणात काही ठराविक योगासन केले तर बऱ्याच समस्या दूर होतात. योग आणि व्यायाम गर्भवती महिलांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर व सशक्त बनवत असतो. रोग प्रतिकारशक्ती वाढते. आणि, सकाळी होणाऱ्या उलट्या, सिकनेस, बद्धकोष्ठता त्यांच्यावरही मात करते. बाळंतपण नॉर्मल व्हायला अडचण येत नाही.

गरोदरपणात पोहणे

गरोदरपणाच्या काळात पायाला सूज येणे हे अत्यंत सामान्य आहे. पण तुम्ही पोहण्याची प्रक्रिया केल्यास तुमच्य पायाची ही सूज जाण्यास मदत मिळते. तसेच तुमची हाडे आणि सांधे मजबूत राहून त्यांना अधिक आराम मिळतो. त्यामुळे रोज किमान अर्धा तास पोहायला जाणे हे तुमच्या तब्येतीसाठी फायदेशीर ठरते

गरोदरपणात ट्रेडमिलवर व्यायाम करणे

गरोदरपणात २० मिनिटे ट्रेडमिलवर धावल्यानेही आरोग्याला फायदा होतो. धावण्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी ठीक राहते, तसेच चयापचय क्रियाही सुरळीत राहते.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा आणि फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)