सावधान! ‘या’ सहा सवयी व्यक्तिमत्त्वासाठी ठरू शकतात घातक, जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला कदाचित माहीत असेल की वाईट सवयी तुम्हाला मानसिक आजारी करू शकतात!  चला जाणून घेऊया त्या सवयींबद्दल

6 habits
'या' सहा सवयी लवकर बदला(सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यालाही खूप महत्त्व आहे, पण माणसाच्या काही सवयी अशा असतात ज्यांचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खरं तर आपल्या मानसिक आरोग्यावर आपल्या सवयींचा परिणाम होतो. वाईट सवयी तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेऊ शकतात. काहींना या सवयी त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहेत हेही कळत नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल की वाईट सवयी तुम्हाला मानसिक आजारी करू शकतात!  चला जाणून घेऊया त्या सवयींबद्दल

सतत काम करत राहणे –

काही लोक कामाप्रती इतके प्रामाणिक असतात की आजारी असतानाही ते काम करत राहतात. यामुळे तो स्वत:ला नीट आराम करू शकत नाही आणि त्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हा कामातून विश्रांती घेणे आवश्यक आहे. यामुळे मनालाही आराम मिळेल.

स्वत:साठी वेळ न काढणे –

असे बरेच लोक आहेत जे दिवसभर कामात व्यस्त असतात आणि स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. असे केल्याने तुम्‍ही कामाप्रती प्रामाणिक बनत आहात पण तुमच्‍या मानसिक स्‍वास्‍थ्‍यावर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या व्यस्थ दिनचर्येतून स्वत:साठी वेळ काढला पाहिजे.

पुरेशी झोप

Netflix आणि Amazon च्या जमान्यात लोक इतके हरवले आहेत की त्यांना झोपण्याच्या वेळेचीही भान राहत नाही. अनेक वेळा यामुळे झोप अपुरी होते. असे केल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकता. दररोज 6-8 तासांची झोप घेणे खूप गरजेचे आहे. कारण पुरेशी झोप न मिळाल्याने हृदय आणि चयापचयाशी निगडित आजार होण्याचा धोका जास्त असतो. ज्यांची झोप पूर्ण न होणाऱ्यांमध्ये मानसिक आजारांचा धोका जास्त दिसून आला आहे. चांगली झोप तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यासाठी तसेच मन शांत आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

फक्त एंजॉय करणे, आपल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करणे –

काही लोक आवश्‍यकतेपेक्षा जास्त खर्च करतात. त्यांना रोज फिरणे, रेस्टॉरंट, क्लबिंग करणे आवडते. असे करणे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. यामुळे स्वतःच्या विकासाकडेही लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत आपण आपल्या गुणवत्ता विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

व्यायाम न करणे

व्यायाम न केल्यानेही तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकता, कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा आनंदी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे तुमचे मन शांत राहते. अशा परिस्थितीत मन निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. रोजच्या व्यायामाच्या सवयीचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. नियमित योगा आणि व्यायाम करणाऱ्यांमध्ये हृदयविकार,मधुमेहाचा धोका कमी असतो. तसेच मन शांत आणि तणावापासून संरक्षण करण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. योगासनामुळे गंभीर आजारांचा धोका कमी तर नैराश्याच्या समस्येने ग्रासलेल्या लोकांना आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर आहे.

सतत विचार करणे –

काही लोक सतत विचार करत असतात. जास्त वेळ विचार केल्यामुळे तणाव येतो. अशा परिस्थितीत तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही नैराश्याचे बळी होऊ शकता.
त्यामुळे जास्त विचार न करता समाधानी राहीलं पाहिजे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 17:32 IST
Next Story
जास्त पाणी प्यायल्यास महिन्याभरात वजन झटपट कमी होते? तज्ज्ञांनी सांगितले योग्य प्रमाण व पद्धत
Exit mobile version