Sweet Foods: तुम्हाला मिठाई आवडते आणि त्यात काहीही चुकीचे नाही. भारतामध्ये मिठाई हे आपल्या दैनंदिन जीवनाशी, सण-उत्सवांशी निगडित आहे. खूप जास्त खाल्ल्याने किंवा चुकीच्या प्रकारची मिठाई खाल्ल्याने पोट जड झाल्यास किंवा रक्तातील साखरेची पातळी पुन्हा पुन्हा वाढू लागल्याने ही समस्या उदभवते. अशा परिस्थितीत मिठाई खाण्याचा आनंद हळूहळू अपराधीपणा आणि त्रासात बदलतो.
चांगली गोष्ट म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी मिठाई पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही. फक्त योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. अशी मिठाई पौष्टिक आणि बनवायला सोपी असते. त्या मिठाईमुळे पोटावर ताण पडत नाही आणि मिठाईची लालसाही भागवते.
चला अशाच काही गोड पदार्थांबद्दल जाणून घेऊ या, जे तुमच्या पचनासाठी सोपे असतात आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासही मदत करतात.
आतड्याचे आरोग्य आणि रक्तातील साखरेचा कसा संबंध आहे?
तुमच्या आतड्याचे आरोग्य ठरवते की, शरीर अन्नावर कशी प्रतिक्रिया देईल. जेव्हा पचन मंद आणि संतुलित असते तेव्हा साखर हळूहळू रक्तप्रवाहात जाते. पण जेव्हा पोट कमजोर असते तेव्हा रक्तातील साखर झपाट्याने वाढते. म्हणूनच फायबर, आंबवलेले पदार्थ आणि आरोग्यदायी चरबी हे खूप महत्वाचे आहेत. पोट-हेल्दी स्वीट स्नॅक्स पचन मंदावते, पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्याशिवाय त्यामुळे अचानक आणि वारंवार होणारी भूकदेखील कमी होते. त्यामुळे साखर नियंत्रित करणे सोपे होते.
तीळ व गुळाचे लाडू
तिळाचे लाडू हे फक्त हिवाळ्यातील गोड पदार्थ नसून पौष्टिक ऊर्जा वाढवणारे आहेत. तीळ पचनास मदत करतात आणि आरोग्यदायी चरबी देतात; तर गूळ नैसर्गिक गोडवा आणि खनिजे प्रदान करतात.
नाचणीचे लाडू
नाचणी हळूहळू पचते आणि शरीराला स्थिर ऊर्जा प्रदान करते. त्यामध्ये भरपूर फायबर असल्याने पोट हलके राहते.
खजूर आणि नारळाचे लाडू
खजूर नैसर्गिकरीत्या गोड असतात आणि ते आतड्यातील जीवाणूंना मदत करतात. नारळात आरोग्यदायी फॅट्स (चरबी)देखील असतात, जे साखरेचे शोषण कमी करतात.
उकडीचे मोदक
उकडीचे मोदकदेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही मोदकात साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. हे मोदक तुपाबरोबर अतिशय स्वादिष्ट लागतात.
श्रीखंड
आतड्याच्या आरोग्यासाठी श्रीखंड दह्यामधील नैसर्गिक प्रो-बायोटिक्स पचनासाठी फायदेशीर असतात. घरी बनवलेले श्रीखंड योग्य प्रकारे तयार केल्यास पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते.
पोहे आणि गुळाचे गोड मिश्रण
पोहे हलके आणि पचायला सोपे असतात. गूळ आणि नारळासोबत एकत्र केल्यावर हा एक समाधानकारक गोड पदार्थ तयार होतो.
