Flipkart च्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ‘ही’ आहेत ५ सर्वोत्तम स्मार्टफोन डील्स

फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमधील सर्वोत्तम स्मार्टफोन डील्सबाबत जाणून घ्या. हा सेल आजपासून सुरु झाला असून ९ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

These are 5 best smartphone deals in Flipkart Big Saving Days Sale gst 97
फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये असलेल्या या ५ सर्वोत्तम स्मार्टफोन डील्सबाबत नक्की जाणून घ्या. (Photo : FlipKart)

फ्लिपकार्ट आपला ‘बिग सेव्हिंग डेज सेल २०२१’ पुन्हा एकदा आणला आहे. हा सेल आजपासून म्हणजेच ५ ऑगस्टपासून सुरु झाला आहे. तर ९ ऑगस्टपर्यंत तो सुरु राहणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलदरम्यान, मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही आणि कपड्यांवर प्रचंड सूट दिली जात आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमधील मोबाईल फोनशी संबंधित सर्वोत्तम डील्सची माहिती देणार आहोत. तर जाणून घेऊयात या सेलमधील ५ सर्वोत्तम स्मार्टफोन डील्स

अ‍ॅपल आयफोन १२ मिनी

फ्लिपकार्टच्या या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आयफोन १२ मिनी ६४ जीबी हा ६९,९०० रुपयांऐवजी फक्त ५९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचप्रमाणे, एक्सचेंज ऑफरअंतर्गत ग्राहकांना यावर १५,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. तर आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड युझर्सनाही यावर १० टक्के सूट मिळू शकते.

अ‍ॅपल आयफोन १२

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अ‍ॅपल आयफोन १२ चे ६४ जीबी व्हेरिएंट ७९,९०० रुपयांऐवजी ६७,९९९ रुपयांना विकला जात आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर १५,००० रुपयांची अतिरिक्त सूट  देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक कार्डधारकांना देखील अतिरिक्त १० टक्के सूट मिळू शकते.

आसुस आरओजी फोन ३

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आसुस आरओजी फोन ३ हा गेमिंग फोन ५५,९९९ रुपयांऐवजी फक्त ३९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर देखील ग्राहकांना एक्सचेंज अंतर्गत १५,००० पर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. दरम्यान, आसुस आरओजी फोन ३ हा फोन स्नॅपड्रॅगन ८६५+ प्रोसेसरसह येतो.

मोटोरोला जी १० पॉवर

फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये हा स्मार्टफोन १२,९९९ रुपयांऐवजी ९,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तर एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर ९,४५० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकेल. त्याचसोबत आयसीआयसीआय बँकेच्या कार्डधारकांना देखील अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल. हा फोन ४८ एमपी क्वॉड कॅमेरा सेटअपसह येतो.

रिअलमी ८

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये रिअलमी ८ (४जीबी, १२८जीबी) १६,९९९ रुपयांऐवजी १३,९९९ रुपयांना विकला जात आहे. हा फोन ५,००० एमएएच बॅटरी आणि ६४ एमपी क्वॉड कॅमेरा सेटअपसह येतो

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: These are 5 best smartphone deals in flipkart big saving days sale gst