‘या’ ५ आयुर्वेदिक उपायांनी मासिक पाळीच्या दुखण्यापासून मिळवा सुटका

मासिक पाळी दरम्यान महिलांना नियमितपणे योगा करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.

lifestyle
पीरियड्सच्या काळात महिलांनी अधिकाधिक पाण्याचे सेवन केले पाहिजे. (photo: Pexels/Indian Express)

मासिक पाळीचा काळ म्हणजे महिलांसाठी रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नाही. कारण या काळात महिलांना पोट आणि पाठदुखी, अंगदुखी, चिडचिड,आणि मळमळ यासारख्या अनेक समस्या होतात. रिपोर्ट्सनुसार, मासिक पाळीच्या दरम्यान क्रॅम्पची लक्षणे बदलू शकतात. काही महिलांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो तर काहींना डायरियासारख्या समस्याही होऊ शकतात.

मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी महिला अनेकदा औषधांचा वापर करतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांवर घरगुती उपायांनीही आराम मिळू शकतो. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

यावेळी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी सांगितले आहे की, “केवळ औषधेच तुमची मित्र नाहीत, तर हे ५ प्रभावी आयुर्वेदिक उपाय देखील तुम्हाला वेदनांपासून आराम देऊ शकतात.”

चहा

मासिक पाळी दरम्यान गरम चहाचे सेवन केल्याने क्रॅम्प्समध्ये आराम मिळतो. अशा परिस्थितीत ज्या महिलांना मासिक पाळीत वेदना आणि सूज येण्याची समस्या आहे, त्यांनी गरम चहाचे सेवन करावे.

गरम पाण्याचा शेक देणे

मासिक पाळीच्या दरम्यान वेदना कमी करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याच्या बाटलीने किंवा बाजारात सहज उपलब्ध असलेली गरम पाण्याची पिशवी याने देखील शेक देऊन वेदना कमी करू शकतात. याने मासिक पाळी दरम्यान पोटाचा खालचा भाग संकुचित केल्याने गर्भाशयातील आकुंचन पावलेल्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते.

सूर्यकिरणे

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मासिक पाळी दरम्यान व्हिटॅमिन डी हे प्रोस्टॅग्लॅंडिनचे उत्पादन कमी करते. यामुळे तुम्हाला जास्त वेदना होत नाही.

अधिकाधिक पाण्याचे सेवन करा.

मासिकपाळीच्या काळात महिलांनी अधिकाधिक पाण्याचे सेवन केले पाहिजे, त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. डॉक्टर दीक्षा भावसार सांगतात की कॅमोमाइल चहा किंवा आले आणि ओवा टाकून प्यायल्याने मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळते.

योगासने

मासिक पाळी दरम्यान महिलांना नियमितपणे योगा करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात. तुम्ही नियमितपाने योगा केल्यास तुम्हाला मासिक पाळीत वेदना होत नाहीत.

या टिप्सचा अवलंब करून तुम्ही मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळवू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: These ayurvedic tips gives instant relief in period cramps scsm