जगभरात मधूमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारत देखील याला अपवाद नाही. बदललेली जीवनशैली, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, पुरेसा व्यायाम न करणे, तणाव ही मधूमेह होण्याची काही कारणे मानली जातात. रोजच्या कामाच्या गडबडीमध्ये आपले सर्वात जास्त दुर्लक्ष आरोग्याकडे होते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराबरोबर पुरेसा व्यायाम करण्याचा सल्ला तज्ञ मंडळी देतात. रोजच्या काही अनहेल्दी सवयींमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. अशाच काही सवयींमुळे मधूमेहाला आमंत्रण मिळू शकते. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरीराची हालचाल न करणे
काहीजणांना दिवसभर झोपुन राहण्याची सवय असते किंवा काहीजण मोबाईल, टॅब किंवा इतर कोणत्या डिवाइसवर बराच वेळ कधीकधी पुर्ण दिवस एका ठिकाणी बसून/झोपून वेब सिरीज, चित्रपट पाहतात. यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. असे केल्याने हृदय आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. अभ्यासातून असे दिसुन आले आहे की त्यांना टाईप २ मधूमेह होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : तुम्हालाही जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय आहे? याचा आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या

हाय कॅलरी डाएट
हाय कॅलरी डायटमुळे वजन वाढण्याची आणि त्याबरोबर टाईप २ मधूमेह होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीची दिवसभरात जितकी शारीरिक हालचाल होते फक्त तेवढ्याच प्रमाणात कॅलरीज घेणे आवश्यक असते. जर एखाद्याचे बैठी काम असेल किंवा शरीराची हालचाल जास्त होत नसेल तर त्यांनी कमी कॅलरी असलेले अन्नपदार्थ खावे.

व्यायाम न करणे
उत्तम आरोग्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम करणे आवश्यक असते. आई-वडील किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर आनुवंशिकतेमुळे इतर कुटुंबातील इतर व्यक्तींना तो होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींना मधूमेह टाळण्यासाठी आधीपासूनच काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा व्यक्तींनी व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज व्यायाम केल्याने मधूमेह टाळता येईल पण जरी मधूमेह झाला तरी व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत मिळते.

अमली पदार्थांचे सेवन
अति धूम्रपान आणि मद्यपानामुळे हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधूमेह असे आजार होण्याची शक्यता असते. धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो, तसेच यामुळे मधूमेह होण्याची शक्यता असते. याप्रमाणे मद्यपान केल्याने देखील फॅटी लिवरची समस्येसह मधूमेह देखील होऊ शकतो.

आणखी वाचा : लठ्ठपणापासून मधूमेहापर्यंत अनेक समस्यांसाठी दालचिनीचे पाणी ठरते फायदेशीर; बनवण्याची पद्धत जाणून घ्या

लठ्ठपणा
लिवर आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये जमा होणाऱ्या चरबीला व्हिसरल फॅट म्हणतात, ज्याचा इन्सुलिनच्या प्रतिकाराशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. व्हिसरल फॅटमुळे व्यक्तीचे वजन वाढते आणि त्यामुळे मधूमेह होण्याची शक्यता असते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These daily habits increase the risk of diabetes know more pns
First published on: 16-09-2022 at 13:37 IST