नियमित योगविद्येचा अभ्यास केल्याने आपले शरीर योग्य आणि सदृढ राहते. डोळ्यांच्या व्यायामामुळे अनेकांना चांगली दृष्टी अवगत होते, याकरिता  त्राटक ध्यान या नेत्र व्यायामामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. डोळे हा अवयव आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे आणि या डोळ्यांची खास निगा राखणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात आपण डोळ्यांचा व्यायाम केला पाहिजे. आपण पाहिले तर तरुणांपासून ते अगदी लहान मुलांचे डोळे देखील कमजोर होत असल्याचे पहायला मिळतंय.

समाजसेवी, आध्यात्मिक गुरु, जीवनशैली प्रशिक्षक, योगा गुरु, व लेखक “अक्षर” यांच्या मते योगा केल्याने एखाद्या व्यक्तीला सुदृढ दृष्टी मिळू शकते आणि त्राटक ध्यान या व्यायामामुळे स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता यासह दृष्टी सुधारण्यास मदत होते.तर सध्या करोनाकाळात बहुतांश माणसे वर्क फ्रॉम होम करतायत. अशातच दिवसभर कम्प्युटर समोर बसून सतत काम केल्याने डोळ्यांचे त्रास उद्भवू शकतात. आणि सध्या करोंनातून बरे होऊन आलेल्या व्यक्तींना काळी बुरशी आणि पिवळी बुरशी असा डोळ्यांचा आजार होऊ लागलाय. त्यामुळे नियमित डोळ्यांचा व्यायाम करा. आणि योग्य काळजी घेतल्यास दृष्टी आणि डोळे निरोगी राहतात. तर जाणून घेऊया कोणते व्यायाम केले पाहिजेत.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

 

1) हलासन

हलासनात शरीराचा आकार हा हल म्हणजे नांगरासारखा होतो. म्हणून याला हलासन असे म्हटले जाते.
कृती :- हलासन व्यायाम करताना आधी पाठिवरती झोपावे. दोन्ही पाय एकमेकांना जोडावेत. दोन्ही हातांचे पंजे जमिनीला लावून कमरेला जुळवून ठेवावेत. आता श्वास हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर दोन्ही पाय सावकाश वरती उचलावे. गुडघे सरळ ठेवत पाय आकाशाच्या दिशेने उंच उचलावेत. पुन्हा पायांना हळूहळू डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करावा.अधिक त्रास होत असेल तर, अशा वेळी दररोजच्या सरावानंतर पाय मागे नेण्याचा प्रयत्न करावा.आपल्या कार्यशक्तीनुसारच हा व्यायाम वाढवावा. अन्यथा मानेला त्रास होण्याची शक्यता आहे.दरम्यान मानेचा किंवा पाठीच्या मणक्याचा विकार असलेल्यांनी हा व्यायाम करणे टाळावे. ज्यांना गळ्याचा गंभीर आजार आहे अशा रुग्णांनीही हे आसन करणे टाळावे.

2) अधोमुख श्वानासन

अधोमुख श्वानासन हे असे योगासन आहे ज्यात शरीर लवचिक होण्यास मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते. अधोमुख श्वानासन सूर्यनमस्कारांतर्गत आसनांपैकी एक आसन आहे.
कृती :- हे योगासन करताना जमिनीवर योग मॅट घालून सरळ उभे राहा. तुमच्या दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता समोरच्या बाजून वाकत तुमचे दोन्ही हात जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय लांब करा ज्यामुळे तुमच्या हाताची आणि मणक्याची हाडं सरळ रेषेत येतील. यामध्ये तुमचे पाय आणि छातीच्यामधे ९० डिग्री अंशाचा कोन होईल. अधोमुख श्वान आसन दोन-तीन मिनिटांसाठी करा.

प्राणायाम

3) अनुलोम विलोम – वैकल्पिक नाकपुडीचा श्वास

अनुलोम विलोम रिक्त पोटात केले पाहिजे, शक्यतो खाल्ल्यानंतर 4 तासांनंतर हा प्राणायाम करावा. एका छान हवेशीर ठिकाणी बसून चिंतन ध्यान करा. आपले मणके आणि मान सरळ ठेवा आणि आपले डोळे बंद करा. या क्षणापलीकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपले मन साफ ​​करा. आपल्या बाह्य मनगटांवर गुडघे टेकून प्रारंभ करा. आपला उजवा हात वापरुन, आपल्या तळहाताकडे आपली मध्यम व अनुक्रमणिका बोटांनी जुळवून घ्या. आपला अंगठा आपल्या उजव्या नाकपुड्यावर आणि आपली अंगठी डाव्या नाकपुड्यावर ठेवा. आपल्या उजव्या नाकपुड्याला आपल्या अंगठ्याने बंद करा आणि आपल्या फुफ्फुसे पूर्ण होईपर्यंत, आपल्या डाव्या नाकपुड्यातून हळूहळू आणि खोल श्वास घ्या. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. पुढे, आपला अंगठा सोडा आणि डावा नाकपुडा बंद करा. उजव्या नाकपुड्यातून हळूहळू श्वास घ्या. आता हे उलट करा, यावेळी उजव्या नाकपुड्यातून आत शिरताना आणि डावीकडून श्वास बाहेर टाकत. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, आपल्या श्वासोच्छवासाबद्दल आणि त्याचा शरीरावर आणि मनावर कसा परिणाम होतो याबद्दल जाणीव ठेवा.

ध्यानाचा एक प्रकार

4) ज्योत त्राटक

त्राटक हा एक डोळ्यांचा व्यायामचा प्रकार आहे . यात डोळ्यांच्या सूक्ष्म व्यायाम केला जातो. हे मेडिटेशन करताना मेणबत्तीची ज्योत आपल्या दिशेने जात आहे का आणि आपल्या डोळ्यांचा अगदी बरोबर आहे का याची खात्री करा. आपण आपल्या उंचीच्या बरोबरीच्या अंतर मेणबत्तीची ज्योत ठेवणे आव्यश्यक आहे .आपण कोणत्याही आरामदायक आसनावर बसू शकतात. तुमचे सर्व लक्ष त्या ज्योत कडे केंद्रित करा.

5) चांगल्या दृष्टीसाठी उपुयक्त आहार

डोळ्यांच्या योग्य दृष्टीसाठी गाजर व्हिटॅमिन ए मुबलक असल्याने त्यांचे सेवन करण्याचा प्रयत्न करा. व्हिटॅमिन ए हे दृष्टीसाठी आवश्यक पोषक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आपण भोपळे, गाजर, गडद पालेभाज्या आणि गोड बटाटे यासारख्या इतर फळ आणि भाज्या देखील समाविष्ट करू शकता.