Bathing Tips: आपल्या देशात दररोज आंघोळ करणे हा दिनचर्येमधील महत्वाचा भाग आहे. मात्र, जगात असे अनेक देश आहेत की त्यामधील लोक आठवडाभर आंघोळ करत नाहीत. आपल्या देशात आंघोळीला दररोजच्या दिनचर्येमधील महत्वाचा भाग समजतात. पण केवळ दररोज आंघोळ करणे पुरेसे नाही. तर त्यासोबतच शरीराची संपूर्ण स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे. कारण आंघोळ केल्यानंतरही शरीराचे अनेक अवयव घाण राहतात आणि ते नीट साफ न केल्याने अनेक शरीरा संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता. तर आम्ही तुम्हाला अशा सहा अवयवांबद्दल सांगणार आहोत ज्यांना आंघोळ करतेवेळी नीट स्वच्छ केले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोळ्यांची स्वच्छता

बहुतेक लोक अंघोळ करताना डोळे धुत नाहीत. त्यामुळे डोळ्यांना अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात. यातील सर्वात सामान्य म्हणजे डोळ्यांना खाज सुटणे आणि संसर्ग होण्याची समस्या. यासोबतच डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याची समस्या देखील उद्भवते. डोळे धुण्यासाठी आंघोळ करताना मग मध्ये पाणी घेऊन प्रत्येक डोळा या पाण्यात ठेवावा. पाण्याने भरलेल्या मग मध्ये डोळा ठेवल्यानंतर, डोळा आतून उघडा आणि बंद करा. पाण्याखाली एक डोळा पाच वेळा उघडा आणि बंद करा. अशाने तुमचा डोळा स्वच्छ होऊन जाईल.

( हे ही वाचा: Drinking Water: जेवताना पाणी प्यायल्याने आरोग्यास होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या ते कसे टाळावे)

कान स्वच्छता

बहुतेक लोक आंघोळ करताना किंवा तोंड धुताना कान स्वच्छ करतात. पण असं करतेवेळी कानाचा मागचा भाग अस्वच्छ राहतो. त्यामुळेच अनेकदा लोकांना कानात खाज सुटण्याची किंवा इन्फेक्शनची समस्या आलेली दिसते. यासाठी आंघोळीनंतर कानाच्या मागील खालचा भाग सुती कापडाने किंवा टॉवेलने स्वच्छ करा.

आपली नखे स्वच्छ करा

आंघोळ करताना नखे ​​साफ होत नाहीत. परंतु दररोज मॅनिक्युअर करणे देखील शक्य नाही किंवा ते परवडणारे देखील नाही. त्यामुळे रोज अंघोळ करताना जुन्या टूथब्रशच्या साहाय्याने हात आणि पायाची नखे स्वच्छ करावीत. जेव्हा तुम्ही दररोज हे करता तेव्हा नखे ​​स्वच्छ करण्यासाठी एक मिनिटही लागणार नाही आणि तुमची नखही स्वच्छ होतील.

( हे ही वाचा: किडनी स्टोन असल्यास ‘या’ गोष्टी नक्की खा; लवकरच समस्येपासून सुटका मिळेल)

नाभी स्वच्छता

नाभीची स्वच्छता फार कमी लोक करतात. पण नाभीवरील घाण संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम करते हे फक्त काहींनाच माहिती असेल. नाभीमध्ये साचलेली घाणही तुम्हाला आजारी बनवू शकते. नाभीसाठी तुम्ही सुती कापड किंवा इअर क्लीनिंग बड्स वापरून तिला स्वच्छ करू शकता.

पायांचे तळवे स्वच्छ करणे

आंघोळ करताना बहुतेक लोक पायांच्या तळव्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. यासाठी आंघोळ करतानाच तुम्ही तुमचे तळवे ब्रशने स्वच्छ करू शकता. तसंच अधूनमधून पेडीक्योर देखील करत जा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These five parts of the body remain impure even after bathing gps
First published on: 16-08-2022 at 15:03 IST