आजकाल थायरॉईडची समस्या अशी बनली आहे जी प्रत्येक व्यक्तिला होतेच. थायरॉईड ग्रंथीतील हार्मोनल संतुलन बिघडल्यामुळे ही समस्या उद्भवते. असंतुलित आहार, कामाचे अनियमित तास आणि तणाव हे घटक कोणालाही थायरॉईडची समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्ही नियमित व्यायामाबरोबरच असे काही पदार्थ आहेत जे आहारात समावेश करून थायरॉईड संतुलन ठेऊ शकता. चला तर मग थायरॉईड नियंत्रित करणाऱ्या पदार्थांबद्दल जाणून घेऊयात.

थायरॉईड म्हणजे काय?

तुमची थायरॉईड ग्रंथी अनेक संप्रेरके बनवते, जी तुमच्या शरीरातील विविध प्रणालींमध्ये भूमिका बजावत असतात. या संप्रेरकांचा श्वासोच्छवास, हृदय गती, पचनसंस्था आणि शरीराचे तापमान यावर थेट परिणाम होत असतो. यासोबतच ते हाडे, स्नायू आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. जेव्हा हे हार्मोन्स असंतुलित होतात, वजन वाढू लागते किंवा कमी होते तेव्हा याला थायरॉईडची समस्या म्हणतात. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत – हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

थायरॉईडची लक्षणे

वजन वाढणे किंवा कमी होणे

घसा खवखवणे

हृदयाच्या हालचालीत बदल होणे

मूड बदलणे

केस गळणे

हे सुपर फूड थायरॉईड हार्मोन्स नियंत्रणात ठेवतील

आवळा

आवळा थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा ८ पट जास्त आणि डाळिंबापेक्षा १७ पट जास्त व्हिटॅमिन सी असते.

मुगडाळ

मुगडाळीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. तसेच मूग डाळ शरीरातील आयोडीनची कमतरता दूर करून पचनासही मदत करते. याशिवाय थकवा आणि वजन दोन्ही कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. लक्षात ठेवा की उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ थायरॉईड संप्रेरकांसाठी फायदेशीर असतात.

नारळ

थायरॉईड रुग्णांसाठी नारळ एखाद्या सुपर फूडपेक्षा कमी नाही. नारळात असलेले मीडियम चेन फॅटी अॅसिड (MCFAs) आणि मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स (MTCs) चयापचय सुधारतात.

आलं

थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी आल्याचे आहारात समावेश करा. कारण आल्यामध्ये झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे तुमचे थायरॉईड बरे करण्यास मदत करतात.

सुका मेवा

थायरॉईड संप्रेरकांच्या चयापचयासाठी शरीराला सेलेनियमची आवश्यकता असते. सुकामेव्यामध्ये सेलेनियम मुबलक प्रमाणात आढळते. जे थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करण्यास मदत करते. लक्षात ठेवा, एका दिवसात २ ते ३ पेक्षा जास्त काजू खाऊ नका. कारण त्यामध्ये भरपूर फॅट असते, ज्यामुळे थायरॉईडची समस्या वाढू शकते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. याच्या मदतीने तुमच्या शरीरातील इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेण्यास मदत होते. याशिवाय झिंक शरीरातील थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन राखण्यासही मदत करते.