आजकाल अनेक लोकं ही किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यातच त्यांची ही समस्या आणखीनच वाढू लागली आहे. कारण त्यांच्या आहारातून नकळत असे काही पदार्थ खाल्ले जाताय. जे किडनी स्टोनच्या लोकांनी अजिबात खाऊ नये. कधीकधी रुग्णाला वेदना सहन करणे अशक्य होते. मुतखडा (किडनी स्टोन) हा आजार आहे, जो पुन्हा पुन्हा होऊ शकतो. एकदा किडनी स्टोनची समस्या कमी झाल्यास पुन्हा ही समस्या काही वर्षात डोकं वर काढते. यासाठी खबरदारी घेणे फार महत्वाचे आहे. विशेषत: अन्नाच्या संदर्भात काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत. किडनी स्टोनच्या समस्येचा सामना करणार्या लोकांनी त्याच्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये. जाणून घेऊयात.
प्रोटीनयुक्त पदार्थ
जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्ही त्या गोष्टींचे सेवन करू नये, ज्यात प्रथिने अधिक प्रमाणात असतात. चिकन, मासे, चीज, अंडी, दही, दूध आणि चणे आणि डाळी इत्यादीं पदार्थापासून बनवलेल्या गोष्टींचा समावेश आहारात करू नये. कारण यामध्ये जास्त प्रथिने असल्याने किडनीवर याचा वाईट परिणाम होतो.




बारीक बिया असलेल्या भाज्या आणि फळे
किडनी स्टोनची समस्या अधिक असल्यास तुम्ही चुकूनही तुमच्या आहारात टोमॅटो, वांगी, काकडी, पेरु आणि इतर बारीक बिया असलेल्या भाज्या आणि फळांचा समावेश करू नये. या पदार्थांचे नकळत तुमच्याकडून सेवन झाल्यास किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते.
जास्त मीठयुक्त पदार्थ
किडनी स्टोनची समस्या असल्यास मिठाचे सेवन कमी करावे. हवा बंद डब्यात ठेवलेले पदार्थ, चायनीज, मेक्सिकन खाद्यपदार्थ देखील खाऊ नयेत कारण त्यात भरपूर प्रमाणात मीठ असते.
फॉस्फरसचे प्रमाण असलेले पदार्थ
फास्ट फूड, टॉफी, जंक फूड, चिप्स, कॅन सूप, चॉकलेट, नट, कार्बोनेटेड पेये, लोणी, सोया, शेंगदाणे, काजू, मनुका यासारख्या पदार्थांमध्ये आधिक प्रमाणात फॉस्फरस असते. यामुळे हे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.
आंबट फळे आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ
संत्री, लिंबू, आवळा यांसह भोपळा, कच्चा तांदूळ, ओवा, चिकू, चॉकलेट, टोमॅटो हे पदार्थ तुमच्या स्टोनला वाढण्यास मदत करतात. यामुळे या पदार्थांचा सेवन अजिबात आहारात करू नये.
शीत पेय (कोलड्रिंक्स)
किडनी स्टोन झाल्यास कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळावे कारण त्यात फॉस्फोरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे स्टोनचा धोका आणखी वाढू शकतो.
(टिप:- वरील टिप्सचा वापर करण्याआधी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)