Live

Health Tips : ‘या’ सवयींमुळे तुम्ही होताय लठ्ठपणाचे शिकार; आजच करा बदल

कोणत्या सवयींमुळे वजन वाढते जाणून घ्या.

Health Tips : ‘या’ सवयींमुळे तुम्ही होताय लठ्ठपणाचे शिकार; आजच करा बदल
(संग्रहित छायाचित्र)

लठ्ठपणा ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. सतत संगणकावर बैठी काम करणे, खाद्यपदार्थांमध्ये जंक फूडचा भडीमार, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, पुरेसा व्यायाम न करणे या आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे सध्या लठ्ठपणा ही समस्या सर्वांना सतावत आहे. लठ्ठपणामध्ये केवळ बाहेरून शरीराचा आकार बदलत नाही तर त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते. लठ्ठपणामुळे टाईप २ मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब या आजारांना तुम्ही बळी पडु शकता. त्यामुळे लठ्ठपणावर ताबा मिळवणे आवश्यक आहे.

लठ्ठपणावर नेमका उपाय काय करावा हे बऱ्याच जणांना माहित नसते. डायट करून म्हणजेच खाण्यावर नियंत्रण ठेवूनही काही जणांचे वजन कमी होत नाही. अनेक पथ्य पाळून देखील वजनात काही फरक दिसत नाही. कारण नकळतपणे आपल्या काही सवयी वजन वाढवण्यास मदत करत असतात. त्या सवयी कोणत्या आहेत जाणून घेऊया.

Health Tips : जेवताना पाणी प्यायल्याने वजन वाढते का? जाणून घ्या

शिळे अन्न खाणे

शिळे अन्न खाणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. पूर्णपणे शिजलेले आणि ताजे अन्न शरीराला निरोगी ठेवते. तर शिळे अन्न खाल्याने शरीरातील फॅट बर्न होण्याची क्षमता कमी होते, परिणामी वजन वाढू शकते.

शरीराची हालचाल न करणे

नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचे वजन लगेच कमी होते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी शरीराची हालचाल करणे आवश्यक आहे. केवळ जिमला जाऊन किंवा कठीण व्यायाम करूनच वजन कमी करता येते असे नाही. तुम्ही दररोज किमान २० मिनिटांसाठी चालु शकता. त्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होईल. वजन कमी करण्यासाठी शरीरातील कॅलरी बर्न होणे आवश्यक असते. बरेच जण दिवसभर एका ठिकाणी बसून काम करतात, त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. यावर उपाय म्हणजे वजन कमी करण्यासाठी थोडा वेळ काढून शरीराची हालचाल करावी.

प्रथिनेयुक्त अन्नपदार्थ न खाणे

प्रथिनेयुक्त अन्नपदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतात. प्रथिनेयुक्त पदार्थ मध्ये डाळी, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता यांचा समावेश होतो. प्रथिने, फायबर, विटामिन आणि कार्बोहाइड्रेट यांचा समावेश असलेले अन्न खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.

पुरेशी झोप न घेणे

प्रत्येक व्यक्तीने किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असते. पुरेशी झोप न घेतल्याने वजन वाढू शकते. झोप पूर्ण न झाल्यास त्यांना येण्याची शक्यता असते आणि तणावामध्ये आपण गरजेपेक्षा जास्त जेवतो. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

आणखी वाचा – तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सफरचंद खाल्ल्यानेही वाढू शकतं वजन; जाणून घ्या या मागील नेमकं कारण

अमली पदार्थांचे सेवन

अमली पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढू शकते. मद्यपान आणि धूम्रपान अतिप्रमाणात केल्यास ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. इतर अनेक समस्यांसह यामुळे वजन देखील वाढू शकते. या सवयी तुमचे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या सवयींमध्ये बदल करून तुम्ही वजन नियंत्रणात आणु शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Live Updates
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी