नारळ पाणी प्राकृतिकरित्या थंड पेय आहे. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमची तहान भागण्यासोबत त्या नारळातील पोषक तत्वांमुळे शरीराला फायदादेखील होतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला आतून गार ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायचा सल्ला सगळेच देत असतात. तसेच हे प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरातील काही अंतर्गत त्रास नाहीसे होतात. पण नारळ पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत, परंतु काही लोक असेही आहेत ज्यांना नारळ पाणी प्यायल्यानंतर त्रासही होऊ शकतो. जाणून घेऊया नारळाचे पाणी कोणासाठी त्रासदायक ठरतं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रोलाइट असंतुलन

नारळ पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते. त्यामुळे ज्या लोकांना जास्त पोटॅशियमची समस्या आहे, त्यांनी हे नारळ पाणी पिण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वास्तविक, नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण इलेक्ट्रोलाइट्सपेक्षा जास्त असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटॅशियमची पातळी झपाट्याने वाढते आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.

कमी रक्तदाब

नारळ पाण्याच्या सेवनाने रक्तदाब कमी होतो. अशा परिस्थितीत ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच नारळ पाण्याचे सेवन करावे.

आणखी वाचा : ‘या’ आजारामुळे हृदयाला सर्वाधिक धोका; जाणून घ्या काय सांंगतात तज्ञ…

वजन वाढणे

नारळाच्या पाण्यात कॅलरीज जास्त असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतील आणि तुमचे वजनही वाढेल.

सिस्टिक फायब्रोसिस

सिस्टिक फायब्रोसिस ही एक अनुवांशिक स्थिती आहे, जी शरीरातील मिठाची पातळी कमी करू शकते. नारळ पाण्यात खूप कमी सोडियम आणि भरपूर पोटॅशियम असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सिस्टिक फायब्रोसिसचा त्रास असेल तर मिठाची पातळी वाढवण्यासाठी नारळ पाणी पिऊ नका.

मूत्रपिंड समस्या

नारळ पाण्यात भरपूर पोटॅशियम असते, ज्यामुळे किडनीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आधीच किडनीची समस्या असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारळ पाण्याचे सेवन करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These people should be careful while drinking coconut water pdb
First published on: 04-10-2022 at 12:53 IST