कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांदरम्यान, सहा मोठ्या कार कंपन्या आगामी काळात डिझेल-पेट्रोल वाहने बनवणे बंद करणार आहेत. या सहा जागतिक कंपन्यांमध्ये भारतीय टाटा समूहाच्या जग्वार लँड रोव्हरचाही समावेश आहे.

‘या’ आहेत कंपन्या

रॉयटर्सच्या अहवालानुसार, स्वीडनची व्होल्वो (Volvo), अमेरिकेची फोर्ड (Ford) आणि जनरल मोटर्स (General Motors), डेमलर एजीची मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz), चीनची बीवायडी (BYD) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) जग्वार लँड रोव्हर (JLR) ग्लासगोमध्ये प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणार आहेत. २१ व्या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्याच्या मोहिमेचा ही प्रतिज्ञा स्वाक्षरी आहे. या अंतर्गत या कंपन्या २०४० पर्यंत जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करतील.

( हे ही वाचा: स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी नवीन मारुती सेलेरियो कार भारतात लाँच! )

टॉप दोन ऑटो कंपन्या स्वाक्षरी करण्यास तयार नाहीत

मात्र, जगातील दोन मोठ्या मोटार कंपन्या आणि टॉप मार्केटच्या अनुपस्थितीमुळे या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. प्रतिज्ञाच्या जवळच्या सूत्रांनुसार, टोयोटा मोटर (Toyota Motor Corp) कॉर्पोरेशन आणि फोक्सवॅगन एजी (Volkswagen AG) या जगातील दोन मोठ्या मोटार कंपन्या यात सहभागी होत नाहीत. त्याचप्रमाणे, अमेरिका, चीन आणि जर्मनी, जे सर्वात मोठ्या कार बाजारपेठांपैकी एक आहेत, ते देखील प्रतिज्ञाचा भाग नाहीत.

( हे ही वाचा: Ducati भारतात लॉंच करणार ‘ही’ शानदार बाईक; जाणून घ्या काय असतील फीचर्स आणि किंमत )

अमेरिका आणि चीनही यात सहभागी होणार नाहीत

सीओपी २६ समिटचे यजमान ब्रिटनने म्हटले आहे की या सहा कंपन्यांव्यतिरिक्त आणखी चार देशांनी २०४० पर्यंत शून्य उत्सर्जन असलेल्या नवीन कार आणि वाहनांच्या धोरणावर सहमती दर्शवली आहे. यामध्ये न्यूझीलंड आणि पोलंडसारख्या देशांचा समावेश आहे. तथापि, अमेरिका आणि चीन या प्रमुख दोन कार बाजारांचा त्यात समावेश नसल्याने त्याच्या यशाबद्दल शंका व्यक्त होत आहेत.

( हे ही वाचा: सेकंड हँड कारची मागणी वाढली! २५ टक्क्यांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या कारण )

‘या’ आघाडीच्या कंपन्यांनीही ठेवले अंतर

स्टेलांटिस (Stellantis) , जगातील चौथ्या क्रमांकाची कार निर्माता कंपनी, जपानची होंडा (Honda) आणि निसान (Nissan), जर्मनीची बीएमडब्ल्यू (BMW) आणि दक्षिण कोरियाची ह्युंदाई (Hyundai) देखील साइन अप न करणाऱ्यांमध्ये आहे. राइड हेलिंग कंपनी उबर (Uber) याचा एक भाग असू शकते. शून्य उत्सर्जन असलेल्या इलेक्ट्रिक कार आणि इतर वाहनांना प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.