हिवाळा लवकरच दार ठोठावणार आहे. या ऋतूमध्ये लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. थंडीच्या दिवसात घशाला खव खव होण्याचं प्रमाण जास्त असतं, घरात, ऑफिसमध्ये किंवा रस्त्याने येताना धुळीचा त्रास झाल्यास घसा खव खवतो. घसादुखीमुळे बोलायला त्रास होण्यासोबतच खाण्यापिण्यातही त्रास होतो. अशा स्थितीत घशाला उबदारपणा हवा असतो. जर तुम्हाला खराब घसा बरा करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काही प्रभावी उपायांची मदत घेऊ शकता. चला जाणून घेऊया स्वयंपाक घरातील मसाल्यांनी घसा कसा बार होईल.

घसा खवखवल्यास हे उपाय करा

  • मीठ

घशातील जीवाणू नष्ट करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे घसा खवखवण्यापासून बराच आराम मिळेल. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन ते तीन वेळा ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. घशाची खवखव दूर करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.

  • आले आणि मध

जर तुमचा घसा खूप खराब झाला असेल तर आले तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी १ चमचा आल्याचा रस घ्या. त्यात थोडा मध आणि १ चिमूट काळी मिरी बारीक करून सेवन करा. हे घशाला उबदारपणा देईल, ज्यामुळे घशातील वेदना आणि संसर्गापासून आराम मिळेल.

आणखी वाचा : ‘या’ तेलामध्ये आहे जादू; अनेक आजारांवर ठरतोय रामबाण उपाय! जाणून घ्या फायदे

  • तुळस

खराब घशाची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने खूप आरोग्यदायी ठरू शकतात. तुळशीच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म घशाच्या समस्या दूर करतात. याचे सेवन करण्यासाठी तुळशीची काही पाने एक कप पाण्यात उकळा. आता या पाण्याने गुळण्या करा. याने तुमच्या घशाला आराम मिळेल.

  • लवंग-मिरपूड

घसादुखी किंवा घसा खवखवण्याची समस्या कमी करण्यासाठी लवंग आणि काळी मिरी बेस्ट उपाय ठरू शकतात. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक ते दोन लवंगा, काळी मिरी पावडर आणि मध घालून चांगले उकळा. आता हे पाणी चहासारखे प्या. यामुळे घशाच्या संसर्गापासून सुटका होईल. यासोबतच घशाच्या इतर समस्याही दूर होतील.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)