Pre-diabetes symptoms: मधुमेह हा एक आजार आहे ज्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. हा रोग हळूहळू गंभीर गुंतागुंतीकडे जातो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका, मूत्रपिंडाचे नुकसान आणि दृष्टी समस्या वाढतात. मधुमेहाचा आजार समजून घेण्यासाठी अनेक लक्षणे आहेत. काही लक्षणे अशी असतात की ती अजिबात दिसत नाहीत पण काही लक्षणे रोगाला सहज पकडण्यास मदत करतात.

प्रत्येक माणसाला मधुमेहाशी संबंधित लक्षणांशी परिचित असणे महत्वाचे आहे. शरीरात होणारे विशेष आणि छोटे बदल ओळखून तुम्ही मधुमेहाची लक्षणे वेळेआधी सहज ओळखू शकता आणि भविष्यात हा आजार टाळू शकता. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, प्री-डायबिटीज झाल्यानंतरही शरीरात साखर वाढण्याची लक्षणे दिसू लागतात. मधुमेह होण्याआधी, सकाळी शरीरात ५ लक्षणे दिसतात, ज्या ओळखून तुम्ही रक्तातील साखरेची वाढ सहज ओळखू शकता. प्री-मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा
Is having figs (anjeer) in summer healthy?
Health Tips: उन्हाळ्यात अंजीर? उद्भवू शकते गंभीर समस्या; लगेच जाणून घ्या

कोरडे तोंड ( Dry Mouth)

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कोरडे तोंड किंवा खूप तहान लागल्यास, ही मधुमेहाची चिंताजनक चिन्हे असू शकतात. शरीरात ही लक्षणे सतत दिसल्यास ताबडतोब तपासणी करा.

( हे ही वाचा: ब्लड शुगर वाढवतात गव्हाच्या पोळ्या? ‘या’ ३ पिठांचा पर्याय ठरू शकतो बेस्ट; डायबिटीजमध्ये दिवसात किती पोळ्या खाव्यात?)

सकाळी मळमळ होणे हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते (Nausea)

सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने मधुमेहाचे आणखी एक लक्षण म्हणजे मळमळ. अधूनमधून मळमळ होत असली तर त्याचे नुकसान होत नाही, परंतु वारंवार मळमळ होणे मधुमेहासाठी धोकादायक लक्षण असू शकते.

( हे ही वाचा: प्रेग्नन्सी दरम्यान आयरनच्या कॅप्सूल घेतल्याने बाळाचा रंग बदलतो का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या)

अंधुक दृष्टी (Blurry vision)

सकाळी उठल्याबरोबर तुमची दृष्टी अंधुक होत असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासावी. मधुमेहामुळे डोळ्याची लेन्स देखील वाढू शकते, ज्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते. जर तुमची रक्तातील साखरेची पातळी खूप लवकर कमी वरून सामान्य झाली तर तुमच्या डोळ्याच्या लेन्सचा आकार बदलू शकतो आणि तुमची दृष्टी अस्पष्ट होऊ शकते.

( हे ही वाचा: दुधात ‘या’ ३ गोष्टी मिसळल्यास बनतात अमृतासमान; याच्या सेवनाने रक्तातील साखर झपाट्याने कमी होऊ शकते)

ही लक्षणे तुम्हाला प्री डायबेटिक असल्याचे देखील सांगतात (What are a few other morning symptoms in diabetics?)

सकाळी उठल्यावर तुम्हाला दिशाभूल, अशक्तपणा, थकवा आणि पाय सुन्न वाटत असल्यास, हे रक्ताच्या पातळीत चढउतार होण्याची चिंताजनक चिन्हे असू शकतात.