आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर आपण सहसा आजारांना बळी पडत नाही. मात्र आपल्या आजूबाजूला असेही काही लोक असतात, जे पावसात थोडेसे भिजले किंवा त्यांनी बाहेरचे पदार्थ खाल्ले की ते लगेच आजारी पडतात. यामागचं कारण म्हणजे आपली कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती. बऱ्याच लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय उत्तम असते. त्यामुळे ते लवकर आजारी पडत नाहीत, या उलट काहींची रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत असते की त्यांना लगेचच रोगांचे संक्रमण होते. तुमच्या शरीरातही जर पुढील लक्षणे दिसत असल्यास, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काय करावे, ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • सतत आळस येणे किंवा सुस्ती वाटते

सुस्त वाटणे हे देखील कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण असू शकते. आपले शरीर नेहमीच रोगांशी लढत असते, त्यामुळे शरीरातील ऊर्जेचा वापर जास्त होतो. त्यामुळे नियमित झोपल्यानंतरही थकवा आणि आळस येतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळेही थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.

  • सतत ताप येणे किंवा थंडी वाजणे

जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते तेव्हा अनेक धोकादायक विषाणू आणि बॅक्टेरिया यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता आपल्यामध्ये नसते. यामुळेच आपल्याला सतत ताप येऊ शकतो. वर्षातून दोन ते तीनवेळा ताप येणे सामान्य आहे. मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांच्यामध्ये ताप येण्याचे प्रमाण अधिक असते. तुम्हालाही सतत ताप येत असेल, तर हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असण्याचे लक्षण आहे.

Diabetes : महिला अगदी सहज नियंत्रणात आणू शकतात टाइप २ मधुमेह; ‘या’ उपायांनी मिळेल आराम

  • पोटासंबंधी तक्रारी

आपली रोगप्रतिकारक शक्ती ही मुख्यतः आपल्या पाचन तंत्राशी संबंधित आहे. अतिसार, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांमुळे तुमचे पोट सतत खराब असेल किंवा दुखत असेल तर हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण असू शकते. म्हणूनच पोटासंबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

घरच्या घरी कशी वाढवायची रोगप्रतिकारक शक्ती?

आरोग्य तज्ज्ञांनुसार, दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास हळद घातलेले पाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होऊ शकते. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून एक चमचा धणे आणि दोन लहान वेलचीबरोबर हे पाणी प्यावे.

सकाळच्या न्याहारीनंतर १० ते ११ च्या सुमारास तुम्ही एखादे फळही खाऊ शकता. पपई, अननस, किवी किंवा सफरचंद या फळांचे सेवन केल्यास उत्तम. या सर्व फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These symptoms indicate immune system has decreased the risk of covid virus infection may increase pvp
First published on: 02-10-2022 at 12:48 IST