आचार्य चाणक्य हे अत्यंत बुद्धिमान आणि कार्यक्षम राजकारणी होते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये व्यक्तीला यश मिळवण्याचे सर्व मार्ग तर सांगितले आहेतच, पण त्या व्यक्तीने कुठे राहावे आणि कुठे नाही याबद्दलही त्यांनी आपल्या ‘चाणक्य नीति’ या पुस्तकात बरेच काही सांगितले आहे, चला जाणून घेऊया…

यस्मिन् देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवाः।
न च विद्या ss गमः कश्चित् तं देशं परिवर्जयेत् ।।

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Chanakya Niti
Chanakya Niti :आर्थिक अडचणी दूर करतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टी, नेहमी राहील लक्ष्मीची कृपा
memory
तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टी वारंवार विसरता? विसरण्याची सवय सामान्य आहे की गंभीर? वाचा सविस्तर…

आचार्य चाणक्यांनी लिहिलेल्या आठव्या श्लोकात म्हटले आहे की, ज्या देशात मान नाही आणि उपजीविकेचे साधन नाही, जेथे भाऊ-बहीण नाही, नातेवाईकही नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता नाही. असा देश सोडावा, अशा ठिकाणी राहणे योग्य नाही. दुसर्‍या देशात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याचा एकच उद्देश असावा की तिथे जाऊन नवीन गोष्टी शिकता येतील.

श्रोत्रियो धनिकः राजा नदी वैद्यस्तु पञ्चमः।
पञ्च यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत् ।।

नवव्या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी लिहिले आहे की, जेथे वेद जाणणारे ब्राह्मण, धनवान, राजा, नदी आणि वैद्य नाहीत, अशा ठिकाणी मनुष्याने एक दिवसही राहू नये. श्रीमंतांमुळे व्यवसाय वाढतो. वेद जाणणारे ब्राह्मण धर्माचे रक्षण करतात. राजा न्याय आणि शासन व्यवस्था स्थिर ठेवतो. पाणी आणि सिंचनासाठी नदी आवश्यक आहे, तर रोगांपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे.

लोकयात्रा भयं लज्जा दाक्षिण्यं त्यागशीलता ।
पञ्च यत्र न विद्यन्ते न कुर्यात् तत्र संस्थितिम् ।।

आचार्य चाणक्य यांनी पहिल्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकात सांगितले आहे की, जिथे जीवन चालवण्यासाठी उपजीविकेचे साधन नाही, व्यवसाय वगैरे नाही, सभ्यता, दान देण्याची प्रवृत्ती नाही, अशा ठिकाणी व्यक्तीने वास्तव्य करू नये.