Healthy Eating Tips: कमी रक्तदाब ही अशी स्थिती आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तदाबाची पातळी अचानक कमी होते. जरी ही एक सामान्य समस्या बनली आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. या स्थितीत शरीराच्या सर्व भागांना रक्तपुरवठा कमी होतो, जो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. अशा स्थितीत अनेक वेळा चक्कर येणे, चीड येणे, डोळ्यांसमोर अंधुक येणे, मळमळ, अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. खराब दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा यांमुळेही कमी रक्तदाब होऊ शकतो. कमी रक्तदाबाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा जेणेकरून अशी समस्या उद्भवणार नाही. तर जाणून घेऊया कमी रक्तदाबात कोणते पदार्थ खावेत?

१) अंडी

अंड हे प्रत्येक दिवशी खावं असं डॉक्टरच सांगतात. अंडे आपल्या शरीराच्या अनेक समस्या दूर करू शकते. तसंच हा कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी सर्वोत्तम आहार मानला जातो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी१२ लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवते. त्यामुळे डॉक्टर कमी रक्तदाबवाल्या रुग्णांना अंडी खाण्याचा सल्ला देतात.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

२) डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खायला आवडते. डार्क चॉकलेट खायला आवडण्यासोबतच त्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. डार्क चॉकलेट खाल्ल्याने कमी रक्तदाब रुग्णांना या समस्येपासून आराम मिळतो. डार्क चॉकलेटमध्ये असे गुणधर्म देखील आढळतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि सामान्य करण्यास मदत करतात.

३) द्राक्षे

कमी रक्तदाबाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी द्राक्षाचा रस खूप प्रभावी आहे. बीपी कमी असल्यास द्राक्षे किंवा द्राक्षाचा रस दिल्यास आराम मिळतो. द्राक्षाच्या रसामध्ये आढळणारे पोटॅशियम रक्तवाहिन्यांच्या वॉलला आराम देऊन रक्तदाब कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना द्राक्षे खाण्याचा किंवा द्राक्षाचा रस देण्याचा सल्ला देतात.

४) पनीर

लो बीपीची समस्या असल्यास कॉटेज चीज खाणे खूप फायदेशीर आहे. जर तुमचे बीपी कमी असेल तर अनेकदा जास्त मीठयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही पनीरमध्ये चाट मसाला किंवा हलके मीठ घालून खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला ताकदही मिळेल आणि लो बीपीच्या समस्येतही आराम मिळेल.

५) कॉफी

कमी रक्तदाब राखण्यासाठी कॅफिन हे सर्वात फायदेशीर मानले गेले आहे. जर रक्तदाब अचानक कमी झाला, तर रुग्णाला कॉफी दिल्यानंतर काही सेकंदातच ते सक्रिय होते. विशेषतः जर काळी कॉफी उपलब्ध असेल तर ती अत्यंत फायदेशीर आहे. हे तुमचे हृदय गती वाढवेल, ज्यामुळे रक्तदाब देखील सामान्य होईल. त्यामुळे कमी रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी कॉफीचे सेवन नक्की करावे.

६) ताक

कमी रक्तदाबाच्या रुग्णाने सकाळी किंवा नाश्त्यानंतर ताक घ्यावे. ताक पिल्यास, तुम्हाला तुमच्या लो बीपीवर नियंत्रण मिळविता येते. यासाठी तुम्ही साधे ताक पिऊ शकता, तसंच ताकामध्ये मीठ, भाजलेले जिरे आणि हिंग मिसळून देखील पिऊ शकता. याने तुमचा बीपी नक्कीच नियंत्रणात येईल.

७) लिंबूपाणी

लिंबूपाणी भरपूर समस्येवर फायदेशीर आहे. लो ब्लडप्रेशरच्या समस्येमध्ये जर आपण लिंबूपाणीमध्ये थोडे जास्त मीठ टाकून प्यायल्यास, खूप फायदेशीर ठरू शकते. मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, त्यामुळे बीपी सामान्य स्थितीत येतो. त्यामुळे कमी रक्तदाबवाल्या रुग्णांना जास्त मीठ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)