scorecardresearch

हिवाळ्यात ‘या’ भाज्या वजन कमी करण्यासाठी मानल्या जातात प्रभावी

लालसर हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

lifestyle
हिरव्या पालेभाज्यांचे आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. (photo credit: jansatta)

थंडीच्या दिवसात मुळा, गाजर, सलगम अशा भाज्या जमिनीखाली पिकतात आणि या भाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. या सर्व भाज्यांच्या हिरव्या पालेभाज्या उगवतात आणि त्यांच्या खाली भाजी कंदाप्रमाणे वाढते, त्यांना लालसर हिरवी किंवा मूळ भाजी असेही म्हणतात. मुळा, गाजर, सलगम, बीट इत्यादी भाज्या हिवाळ्यात अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या घरी जेवणात बनवल्या जातात, तसेच या सर्व हिरव्या भाज्यांचे महत्त्व काही कमी नाही.

लालसर हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, क्लोरीन, सोडियम, लोह, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ए, बी आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. लोकं या हिरव्या भाज्या अनेक प्रकारे बनवतात आणि खातात. तर काही लोकं या भाज्यांचे पराठे बनवून खातात. या हिरव्या पालेभाज्या कोणत्याही पद्धतीने बनवून खाल्ल्या तरी त्यांचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात लालसर हिरव्या भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत, चला जाणून घेऊयात.

वजन कमी करण्यास मदत करतात

गाजर-मुळ्याच्या पानांमध्ये खूप कमी कॅलरीज असतात, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. जर तुम्ही मुळा-गाजर सोबत त्याची पाने खात असाल तर तुमचे पोट जास्त प्रमाणात भरलेले असेल आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील.

या भाज्या यकृतला डिटॉक्स करतात

ऑर्गेनिक फॅक्टच्या बातमीनुसार, लालसर हिरव्या भाज्या या यकृत डिटॉक्सिफिकेशनसाठी अतिशय प्रभावी खाद्यपदार्थ आहे. त्यांचा रस बनवूनही आहारात सेवन करता येते. हिरव्या भाज्या लघवीचे विकार दूर करण्यासाठीही उपयुक्त आहेत. त्यामुळे लालसर हिरव्या रंगाच्या भाज्यांच्या सेवनाने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

या भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात

कंदमुळे तयार होणार्‍या भाज्यांच्या हिरव्या पानाच्या भाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, कारण त्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे गाजर, मुळा यांच्या तुलनेत या सर्व भाज्यांच्या हिरव्या पालेभाज्यांचे आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते.

कोलेस्ट्रॉल कमी करते

पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी हे घटक हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे या भाज्यांचा फायदा होतो. या भाज्या रक्तदाब कमी ठेवण्यास आणि खराब झालेल्या रक्तवाहिन्या आणि धमन्या दुरुस्त करण्यात मदत करतात. त्याचबरोबर या भाज्यांच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात.

रक्तातील साखर नियंत्रित करते

उच्च फायबर आहार असल्याने, हिरव्या भाज्या नेहमी रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत करतात. तसेच मुळा या च्या हिरव्या पानाची भाजी आहारात नियमित खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी कायम राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: These vegetables can control your weight know the health benefits of root vegetable leaf or saag in winter scsm

ताज्या बातम्या