scorecardresearch

या उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय? भारतातील ही पाच ठिकाणं देतील सुट्टीचा सर्वोत्तम अनुभव

या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील, कुठे जायचं याबद्दल विचार करत असाल, तर अशी काही सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता.

या उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय? भारतातील ही पाच ठिकाणं देतील सुट्टीचा सर्वोत्तम अनुभव (Photo : Pexels)

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता सुरु झाल्या आहेत. मित्रपरिवारासोबत फिरायला जाण्याचा आणि मजा मस्ती करण्याचा हंगाम सुरु झाला आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी फिरायला गेला असाल आणि या वर्षी कुठे जायचं याबद्दल विचार करत असाल, तर अशी काही सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुम्ही या एप्रिलमध्ये फिरायला जाऊ शकता.

पहलगाम (Pahalgam):

पहलगाम हे जम्मू आणि काश्मीरमध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. जर तुम्ही एप्रिलमध्ये येथे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर अवंतीपूर मंदिर, सारन हिल्स, ममलेश्वर मंदिर, पहलगाम गोल्फ कोर्स, कोल्होई ग्लेशियर, चंदनवारी, आणि काही तलाव पाहण्यासाठी आवर्जून वेळ काढा.

मनाली (Manali):

मनाली हे पीर पंजाल आणि धौलाधर पर्वतरांगांवर असलेले अतिशय लोकप्रिय हिल स्टेशन आहे. येथे मणिकरण साहिब, हिडिंबा मंदिर यासह अनेक सुंदर ठिकाणांना भेट देण्यासोबतच तुम्ही साहसी खेळांचाही आनंद घेऊ शकता.

कौतुकास्पद! कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर बँकेने त्याच्या कुटुंबियांना केली अशी मदत की अनेक पिढ्यांचं होणार भलं

शिमला (Shimla):

शिमला हे देखील लोकप्रिय हिल स्टेशन्सपैकी एक आहे. शिमला हि हिमाचल प्रदेशची राजधानी आहे आणि येथे भेट देण्यासाठी द रिज शिमला, मॉल रोड, जाखू हिल आणि मंदिर, सोलन यासारखी सुंदर ठिकाणं आहेत. येथील दृश्य तुम्हाला मोहात पाडतील.

नैनीताल (Nainital):

नैनिताल हे उत्तराखंडमधील कुमाऊं टेकड्यांमध्ये वसलेले सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही नैनी तलाव, नैना देवी मंदिर, मॉल रोड, स्नो व्ह्यू पॉइंट, टिफिन टॉप यासह अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.

गंगटोक (Gangtok):

गंगटोक हे सिक्कीममधील एक सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही नाथू ला पास, ताशी व्ह्यू पॉइंट, एमजी रोड, हनुमान टोक आणि रेशी हॉट स्प्रिंग्स पाहू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thinking of going for a trip in april these five places in india will give you the best holiday experience pvp