Benefits of Drinking Water In The Morning:  पाणी हा घटक शरीरासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. मानवी शरीराचा जवळपास ६० टक्के भाग पाण्यावर अवलंबून आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. यामुळे दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक असते. यात गरमीच्या दिवसात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी शक्य तितकं पाणी पित राहणे गरजेचं असते. पाण्याच्या कमरतेमुळे डोकेदुखी, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, सांधेदुखी, अपचन, रक्तदाब, लठ्ठपणा आणि स्तनाचा कर्करोग असे अनेक आजार उद्भवू शकता. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत किती पाणी प्यावं आणि त्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊ..

पाणी पिण्याचे फायदे

शरीरास निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेच आहे. रक्तामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते जे शरीरातील वेगवेगळ्या भागांत ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. पाणी शरीरातील विविध अवयव आणि ऊतींचे रक्षण करते.

Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल

झोपताना इअरफोन लावून गाणी ऐकताय? मग सावधान! वाचा, रिसर्च काय सांगतो?

१) पचनसंस्था निरोगी राहते.

ज्या दिवशी तुम्ही उपवास करता त्यादिवशी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढू शकतो. यामुळे पचनसंस्था सुधारते तसेच बद्धकोष्ठता, ॲसिडिटीपासून सुटका होण्यास मदत होते.

२) वजन कमी होते.

नियमित योग्यप्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पाणी प्यायलाने भूक कमी लागते, त्यामुळे आवश्यक तेवढंच अन्न पोटात जाते. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने लघवीसोबत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत होते.

३) थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.

जर तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर पाणी पिणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. शरीरातील निर्जलीकरणामुळे थकवा जाणवतो. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केलं पाहिजे. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण साखळी सुरळीत राहते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.

४) तणाव कमी होतो.

मेंदूतील ७० ते ८० टक्के ऊती पाण्याने बनलेल्या असतात. ही पाणी पातळी कमी झाल्यास डिहायड्रेशन होते आणि शरीरासोबतच मेंदूलाही ताण जाणवतो. म्हणूनच तणाव कमी करण्यासाठी ठरावीक वेळाने पाणी पिणं गरजेचं आहे.

५) केसांचे सौंदर्य सुधारते.

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे केस खूप नाजूक होतात. केस कोरडे आणि निर्जीव होण्यामागे शरीरातील पाण्याची कमरता हे मुख्य कारण सांगितले जाते. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसांची वाढ लवकर होते.

दिवसभरात किती आणि केव्हा पाणी पिणं योग्य?

सकाळी उठल्यानंतर दररोज उपाशीपोटी किमान ३ ग्लास पाणी प्यावे.

दुपारी जेवणानंतर एक तासापर्यंत पाणी पिणं टाळा. त्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.

सकाळी पाणी पिल्यानंतर ४५ मिनिटांनी नाश्ता करा.

रात्री जेवणानंतरही किमान अर्ध्या तासांनी पाणी प्या, तसेच झोपण्यापूर्वी पोटभर पाणी पिणं टाळा.