आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; UIDAI ने केली यादी जाहीर

आधार कार्ड अनेक ठिकाणी महत्त्वाचं असल्यामुळे आधार अद्ययावत करण्यासाठी कोणती कागदपत्रे वैध असतील या संदर्भात यूआयडीएआयने कागदपत्रांची यादी जारी केली आहे.

aadhar card update
आधार कार्ड अपडेट (प्रातिनिधिक फोटो)

भारतात आधार कार्ड किती महत्त्वाचं आहे हे वेगळ सांगायची गरज नाही. आधारचा वापर बँक खात्यापासून पासपोर्ट बनवण्यापर्यंत सर्वत्र केला जातो. सामान्य माणसाची ओळख म्हणूनही त्याची ओळख आहे. UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आधार कार्ड अनेक ठिकाणी महत्त्वाचं असल्यामुळे त्यावर चुकीची जन्मतारीख किंवा चुकीचा पत्ता तुम्हाला अडचणीत आणू शकतो, म्हणून जर तुमच्या आधारमध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करा.आधार अद्ययावत करण्यासाठी कोणती कागदपत्रे वैध असतील या संदर्भात यूआयडीएआयने कागदपत्रांची यादी जारी केली आहे.

UIDAI ने ट्विट करत दिली माहिती

आधार जारी करणारी संस्था UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की जर तुम्हाला आधार अपडेट करायचे असेल तर तुम्ही वापरलेले दस्तऐवज तुमच्या नावावर आहे आणि वैध आहे याची खात्री करा.

या कागदपत्रांचा स्वीकार केला जातो

UIDAI च्या मते, आधार कार्डसाठी ओळखीच्या पुराव्यासाठी ३२ प्रकारची कागदपत्रे स्वीकारली जातात . नातेसंबंधाच्या पुराव्यासाठी (Proof Of Relationship) १४ , जन्म तारखे साठी १५ आणि पत्त्याचा पुरावा (PoA) साठी ४५ कागदपत्रांचा स्वीकार केला जातो. या कागदपत्रांची यादी खाली देत आहोत.

नात्याचा पुरावा (Proof Of Relationship)

१. मनरेगा जॉब कार्ड
२. पेन्शन कार्ड
३. पासपोर्ट
४. आर्मी कॅन्टीन कार्ड

DOB डॉक्युमेंट्स (DOB Documnets)

१. जन्म प्रमाणपत्र
२. पासपोर्ट
३. पॅन कार्ड
४. मार्क शीट्स
५. SSLC पुस्तक/प्रमाणपत्र

ओळखीचा पुरावा (Proof Of Identity – PoI)

1. पासपोर्ट
2. पॅन कार्ड
3. रेशन कार्ड
4. मतदार ओळखपत्र
5. ड्रायव्हिंग लायसन्स

या यादीमुळे निश्चितच अनेकांना फायदा होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: This documents required to update aadhar card uidai announces list ttg