मधुमेहींसाठी ‘हे’ फळ आहे खूप फायदेशीर, रक्तातील साखर करते नियंत्रित

२०१९ सालापर्यंत भारतात मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या ७० दशलक्ष होती आणि ती झपाट्याने वाढत आहे.

Diabetes myths and facts
प्रातिनिधिक फोटो

मधुमेहाच्या (diabetes) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या मते, २०१९ सालापर्यंत भारतात मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या ७० दशलक्ष होती आणि ती झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हा असाध्य आजार आहे, परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते रुग्ण आपली जीवनशैली बदलून या आजारावर नियंत्रण मिळवू शकतात. किवी (Kiwi) हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.

WebMD नुसार, १ कप (१८० ग्रॅम) किवीमध्ये ११० कॅलरीज, ६% कॅल्शियम, ३% लोह, २५ माइक्रोग्राम फॉलिक, ५% व्हिटॅमिन बी-६ आणि ७% मॅग्नेशियम, ०.९ ग्रॅम फॅट, ५.४ mg सोडियम, १६% पोटॅशियम, 8% कार्बोहायड्रेट, २०% आहारातील फायबर, १६ ग्रॅम नैसर्गिक साखर, २.१ ग्रॅम प्रथिने, ३% व्हिटॅमिन ए २७८% व्हिटॅमिन सी आढळते.

(हे ही वाचा: Diabetes Symptoms: ‘ही’ पाच आहेत मधुमेहाची लक्षणं, आजच करा रक्तातील साखरेची चाचणी)

खरे तर किवी हे पोषक तत्वांनी परिपूर्ण फळ आहे. किवीचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी स्नॅक म्हणून आस्वाद घेऊ शकतात, कारण सर्व फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते, तसेच नैसर्गिकरीत्या साखरेचा समावेश होतो. त्यामुळे किवीचे सेवन कमी प्रमाणात करावे. संतुलित आहार राखण्यासाठी, किवी १४० ते १८० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी खाऊ शकतो. किवीमध्ये नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवत नाही. तसेच किवीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर लवकर वाढत नाही. त्याचे ग्लायसेमिक लोड ४ आहे, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे.

(हे ही वाचा: कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय? चुकीच्या वेळेचा किडनीवर होऊ शकतो परिणाम)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर फळांमध्ये किवी, जामुन, कमरखा (स्टार फ्रूट), पेरू, बेरी, सफरचंद, अननस, नाशपाती, टरबूज, जॅकफ्रूट, एवोकॅडो, ब्लॅकबेरी, चेरी, पीच, नाशपाती, मनुका, स्ट्रॉबेरी इत्यादींचा समावेश होतो. या फळांमध्ये साखरेचे प्रमाणही खूप कमी असते आणि त्यांचा ग्लायसेमिक भारही ६ च्या आसपास असतो.

(हे ही वाचा: विश्लेषण: आईस्क्रीममुळे शरीराला खरंच थंडावा मिळतो का? जाणून घ्या)

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This fruit beneficial for diabetics patient can control blood sugar ttg

Next Story
आरोग्यवार्ता : जीवनशैली बदलून साखरेचा मोह टाळा
फोटो गॅलरी