बदलत्या जीवन पद्धतींमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. यात, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश होत असतो. आपण या आजारांवर मात करण्यासाठी आपल्या घरातील स्वयंपाकखोलीतील पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करुन या आजारांना दूर करु शकतो.

रवा हा प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकखोलीमध्ये असतो. मात्र, याचे तुम्हाला बरेचसे फायदे माहित नसतील. रवा खाल्ल्यानंतर पचनाचा त्रास होत नाही. हा सहज पचण्याजोगा अन्नपदार्थ आहे. ते खाल्ल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यांसारखे आजार नियंत्रणात राहतात. चला तर मग जाणून घेऊया त्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत, ज्यामुळे हे आजार दूर करण्यात मदत होते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

(आणखी वाचा : झटपट वजन कमी करायचयं; वापरा ‘ही’ वेगळी पद्धत, आठवड्यातच दिसेल फरक )

रव्यामध्ये कोणते पोषक घटक आढळतात?

  • रव्यामध्ये कॅलरीज, कार्ब्स, प्रोटीन, थायमिन, फायबर, फोलेट, रिबोफ्लेविन, लोह, मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्याचा आहारात समावेश करणे चांगले आहे.
  • त्यात फायबरचे प्रमाणही चांगले असते, जे हृदयरोग नियंत्रणात मदत करते. इतकंच नाही तर बीपी, सूज आणि कोलेस्ट्रॉलची समस्याही कमी होण्यास मदत होते.
  • रवा हा आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. यासोबतच हे पचनसंस्था दुरुस्त करण्याचे काम करते.
  • रवा हा थायमिन, फोलेट आणि जीवनसत्त्व-ब चा देखील चांगला स्रोत आहे, जो तुम्हाला जास्त खाण्यापासून देखील प्रतिबंधित करतो. याचे सेवन केल्याने तुम्ही दीर्घकाळ पोटभर राहाल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)