दूध फुटल्यावर अनेकजण ते दूध फेकून देतात. किंवा बहुतेक घरातील महिला दुधापासून पनीर बनवतात. पण असे करताना अनेकदा आपण दुधाचे उरलेले पाणी फेकून देते. पण तुम्हाला माहित आहे का की फाटलेल्या दुधाचे हे पाणी तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच तुमचे आरोग्य देखील सुधारू शकते. तसंच तुमच्या केसांशी निगडित समस्याही सोडवू शकते. चला तर मग जाणून घेऊया फाटलेल्या दुधाचे पाणी वापरून तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेहऱ्याची चमक वाढवते

फाटलेल्या दुधाच्या पाण्यात लॅक्टिक अॅसिडचे प्रमाण चांगले असते. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते वापरण्यासाठी फाटलेल्या दुधात १ कप साधे पाणी मिसळून चेहरा धुवा. याशिवाय आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत २-३ कप फाटलेल्या दुधाचे पाणी मिसळूनही आंघोळ करू शकता. फाटलेल्या दुधाच्या पाण्यात सूक्ष्मजीव गुणधर्म असतात. जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकून चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतात.

(हे ही वाचा: Oral Health Tips: ब्रश केल्यानंतरही फ्लॉसिंग करणे खूप महत्वाचे आहे; जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे)

केसांना बनवा चमकदार आणि मुलायम

जर तुम्ही केसांमधील कोरडेपणा किंवा केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर सर्वात आधी केस शॅम्पू केल्यानंतर फाटलेल्या दुधाच्या पाण्याने केस चांगले धुवा. हे पाणी केसांवर ३ ते ४ मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. तुमच्या लक्षात येईल की तुमचे केस पूर्वीपेक्षा अधिक चमकदार आणि रेशमी झाले आहेत.

वनस्पती अन्न

फाटलेल्या दुधाच्या पाण्यात कॅल्शियम आणि इतर अनेक खनिजे असतात. जे आपल्या आरोग्यसोबतच झाडांसाठी देखील फायदेशीर असतात. फाटलेल्या दुधाचे पाणी झाडांच्या मुळांमध्ये कमी प्रमाणात टाकल्यास त्यांची चांगली वाढ होते.

(हे ही वाचा: Immunity Booster: रोज सकाळी ‘ही’ कामे करा, अनेक आजार जवळ देखील येणार नाहीत)

भाजी किंवा चपातीचे पौष्टिक मूल्य वाढवा

फाटलेल्या दूधाचे पाणी ग्रेव्हीमध्ये वापरल्याने भाजीचे पौष्टिक मूल्य वाढते. याशिवाय, जर तुम्हाला रोटीसाठी पीठ मळून घेताना तुम्ही साध्या पाण्याऐवजी फाटलेल्या दुधाचे पाणी देखील वापरू शकता. यामुळे रोटी अधिक पौष्टिक होईल.

ज्यूसमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवा

फाटलेल्या दुधाच्या पाण्यात प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. ज्यूसमध्ये हे पाणी मिसळल्याने त्यातील प्रोटीन वाढते, जे शरीरासाठी फायदेशीर असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Throwing away the milk after it has burst know its benefits for hair and brightening face gps
First published on: 07-08-2022 at 18:34 IST