Thyroid cancer symptoms: थायरॉईड कर्करोग हा स्तनाच्या किंवा फुप्फुसाच्या कर्करोगाइतकाच भयंकर असतो. लोक त्याबद्दल बोलत नाहीत; परंतु त्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. थायरॉईड ही तुमच्या मानेतील एक लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे आणि ती तुमचे चयापचय, ऊर्जा व हार्मोन्स नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावते. कारण- ती लपवून ठेवली जाते आणि नेहमीच वेदना देत नाही. त्यामुळे समस्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहू शकतात. म्हणूनच थायरॉईड कर्करोग अनेकदा लोकांमध्ये डोकावून जातो.

जागतिक स्तरावर ही संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार थायरॉईड कर्करोग हा आता सर्वांत सामान्य अंतःस्रावी घातक आजार आहे आणि अनेक देशांमध्ये महिलांच्या बाबतीतील त्याचा दर पुरुषांपेक्षा जास्त आहे. एकट्या भारतात दरवर्षी अनेक लोकांच्या बाबतीत या आजारा निदान होते आणि बहुतेकदा ते वयाच्या ३० ते ५० च्या दरम्यान. त्यापैकी बऱ्याच प्रकरणांमध्ये जेव्हा मानेतील गाठी लक्षात येतात तेव्हाच त्याचे निदान होते किंवा डॉक्टरांना असंबंधित समस्यांसाठी नियमित तपासणीदरम्यान हा आजार आढळतो. “इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि तृतीयक अंतःस्रावी केंद्रांसारख्या संस्थांनी प्रकाशित केलेल्या भारतीय अभ्यासात वारंवार असे दिसून आले आहे की, थायरॉईड कर्करोग बहुतेकदा असंबंधित कारणांसाठी केलेल्या स्कॅन किंवा तपासणीदरम्यान योगायोगाने आढळतो. सामान्य लोकांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य सेवेच्या उपलब्धतेमध्ये अजूनही जागरूकता मर्यादित आहे,” असे जयपूरच्या मानसरोवर येथील एचसीजी कर्करोग केंद्राचे सल्लागार ऑन्को-सर्जन डॉ. निखिल मेहता यांनी ‘टीओआय हेल्थ’ला सांगितले.

थायरॉईड ग्रंथीचा महत्त्वाचा परिणाम समजून घेणे

याबाबतची जागरूकता महत्त्वाची आहे. बरेच लोक मानेतील सूक्ष्म बदलांकडे दुर्लक्ष करतात, जसे की सूज येणे, सतत गाठ येणे किंवा घट्टपणाची भावना. त्यांना वाटते की हे फक्त ताण, वजनातील चढ-उतार किंवा काहीतरी किरकोळ बाब आहे. पण, ही थायरॉईड कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

“थायरॉईड ग्रंथी मानेच्या तळाशी असते आणि चयापचय, ऊर्जा व शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा या ग्रंथीमध्ये कर्करोग विकसित होतो तेव्हा सुरुवातीची लक्षणे सूक्ष्म असतात. वेदनारहित गाठ, आवाजात हलका बदल किंवा घशात अडकल्यासारखं वाटणे, यांसारख्या बदलांकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते किंवा ताण, संसर्ग किंवा जीवनशैलीतील बदल या बाबी दुर्लक्ष होण्यास कारणीभूत ठरतात,” असे डॉ. निखिल म्हणतात.

“मानेमध्ये थोडीशी सूज येते तेव्हा त्याकडे सहजपणे दुर्लक्ष होणे शक्य आहे. कारण- ती सूज दुखण्याचा त्रास देत नाही आणि दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत नाही. भारतातील हजारो लोकांच्या बाबतीत या विलंबामुळे थायरॉईड कर्करोगाचे निदान व्हायला उशीर होतो. थायरॉईड कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो उपचार करण्यायोग्य कर्करोगांपैकी एक म्हणून केला जातो. आव्हान केवळ उपचारांमध्ये नाही, तर रोगाचे निदान, चर्चा आणि कारवाई किती लवकर होते यात आहे. निदानातील विलंब हा एक प्रमुख चिंतेचा विषय आहे, मुख्यत्वे त्याच्या लक्षणे नसलेल्या स्वरूपामुळे,” असे तज्ज्ञ पुढे म्हणतात.

मानेची लक्षणे असलेल्यांनी अधिक सतर्क राहावे

डॉ. निखिल म्हणतात की, ज्यांच्या कुटुंबात थायरॉईड विकारांचा इतिहास आहे, ज्यांना डोक्यात किंवा मानेमध्ये रेडिएशन थेरपीचा पूर्वीचा संपर्क आला आहे, दीर्घकालीन थायरॉईड नोड्युल आहेत किंवा काही हार्मोनल असंतुलन आहेत त्यांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. महिलांना, विशेषतः मध्यम वयात, अनेकदा थायरॉईडशी संबंधित बदलांचा अनुभव येतो आणि त्यांनी सतत मानेच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

“जेव्हा थायरॉईड कर्करोगाचे लवकर निदान होते, तेव्हा उपचारांचे परिणाम लक्षणीयरीत्या चांगले असतात. व्यवस्थापनात सहसा शस्त्रक्रिया समाविष्ट असते. त्यानंतर योग्य वैद्यकीय उपचार आणि दीर्घकालीन देखरेख असते. सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे म्हणजे कमी व्यापक शस्त्रक्रिया, कमी गुंतागुंत आणि उपचारानंतर जीवनाची गुणवत्ता सुधारणे”, असे ते म्हणाले.